ही माहिती 18 वर्षांवरील प्रेक्षकांनीच पहावी. पालकांच्यासोबत किंवा त्यांच्या सल्ल्याने पुढील दृष्यं पहावीत. 18 वर्षांखालील मुलांनी ही दृष्यं पाहणे टाळा . * T&C and Privacy Policy also apply
सेक्स म्हणजे केवळ शरीरसुख नव्हे तर त्याचे काही आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. मात्र आज 21 व्या शतकातही कामजीवनाकडे एका विशिष्ट आणि संकुचित दृष्टीने पाहिले जाते. कामजीवनाबद्दल पुरेशी सजगता समाजात नसल्याने अनेक समस्या आणि आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र अशावेळी ई साहित्य प्रतिष्ठानने या विषयाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी ‘वात्सायनकृत कामसूत्र’ ई बूकच्या माध्यमातून शनिवारी प्रकाशित केले आहे. ‘कामसुत्रा‘च्या हटके पोजिशन्सनी वाढवा सेक्सलाईफचा आनंद !
प्रकाशनापूर्वी मागवला ऑनलाईन कौल –
ई साहित्य प्रतिष्ठानच्या ‘वात्सायनकृत कामसूत्र’ या ई बूकचे भाषांतर सुनील सामंत यांनी केले आहे. मात्र कामजीवनाविषयी समाजात उघडपणे बोलले जात नसल्याने हे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी नेटिझन्सचा कौल मागवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. कामसुत्राला आजही अश्लीलतेशी जोडले जाते. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर असा आरोप ई साहित्य प्रतिष्ठानावर होऊ नये म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. व त्याच्या उत्स्फुर्त आणि सकारात्मक प्रतिसादानंतरच हे साहित्य ऑनलाईन खुले करण्यात आले आहे.
काय आहे पुस्तकात ?
‘वात्सायनकृत कामसूत्र’ या पुस्तकात 800 वर्षांपूर्वीचे सामाजिक संदर्भ देण्यात आले आहेत. तसेच पुस्तकामध्ये केवळ कामजीवनाबद्दल भाष्य नसून घर कसे असावे? सेक्सचा आनंद घेण्यापूर्वी कशी तयारी करावी याबाबत लेखकाने माहिती दिली आहे. तसेच कामजीवनाबाबत असलेले वाद – प्रतिवाद, समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
ई साहित्य प्रतिष्ठानचे ‘वात्सायनकृत कामसूत्र‘ हे ई बूक (पीडीएफ) वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संबंधित दुवे -
सेक्सच्या सुखद अनुभवांसाठी पाळा हे स्टेप बाय स्पेप ‘सेक्स गाईड’ !
पहिल्यांदा ‘सेक्स’करताना पुरूषांनी ठेवावे या ’8′ गोष्टींचे भान !
सेक्स गाईड – कसा घ्यावा महिलांनी पहिल्यांदा सेक्स करताना आनंद
छायाचित्र सौजन्य – ई साहित्य प्रतिष्ठान
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.