पोटात दुखणे, गुदद्वारा (अॅनस)जवळ खाज येणे ही सामान्य लक्षण वाटू शकतात. परंतू ही सारी ‘हर्निया’ या आजाराची लक्षणं असू शकतात. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास त्यातील गुंतागुंत अधिक वाढू शकते. काही शस्त्रक्रिया, लठ्ठपणा, बद्धकोष्ठता, कमजोर स्नायू यामुळे हर्निया जडू शकतो. प्रामुख्याने पुरूषांमध्ये आढळणार्या या आजारावर शस्त्रक्रियेने वाढलेला भाग किंवा स्क्रिन काढणे हाच उपाय उपलब्ध आहे. म्हणूनच वेळीच ओळखा हर्नियाची खालील लक्षणं
- पोटाजवळ किंवा गुदद्वाराजवळ फुगवटा आल्यासारखे वाटल्यास तात्काळ डॉक्टरकडे जा.
- मांडीजवळ किंवा गुद्द्वाराजवळ खाज येणे ही हर्नियामधील सुरवातीच्या ट्प्प्यातील लक्षण आहे. त्यामुळे ही लक्षण दुर्लक्षित न करता वेळीच उपचार केल्यास हर्निया रोखण्यास मदत होते.
- मलविसर्जनाच्या वेळेस रक्त पडणे किंवा त्या भागाजवळ ताण येत असल्यास वेळीच लक्ष द्या. यासोबतच मळ्मळणे किंवा उलट्या होणे ही हर्नियाची लक्षण आहेत.
- हायएटल हर्निया ( hiatal hernia) हा पोटाच्या वरच्या बाजूला होतो. यामध्ये पित्त होणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणं आढळतात.
- बेंबी, मांडी, गुदद्वाराजवळ वेदनादायी फुगवटा जाणवत असल्यास ते हर्नियाचे लक्षण आहे.
- तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासासोबत मलविसर्जनातून रक्त जाणे हे पोटाजवळील हर्नियाचे लक्षण आहे. अशावेळेस उठता-बसताना ताण आल्याने तेथील स्क्रीन अधिक वाढू शकते.
- झोपल्यावर पोटाजवळचा फुगवटा जाणवत नाही मात्र उभे राहिल्यावर किंवा पोटावर दाब दिसल्यास पुन्हा जाणवणे हे दुर्लक्षित करू नका. त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हर्नियाचे विविध प्रकार आढळतात मात्र त्याची लक्षणं ही सारखीच असतात. फार उशीर न केल्यास वाढणारा फुगवटा कमी करणे शक्य आहे. त्यामुळे आजाराबाबत अधिक भीती बाळगून किंवा शरम वाटून हा आजार लपवू नका. यामुळे भविष्यात त्यातील गुंतागुंत अधिक वाढत जाते.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Is it hernia? Here’s when you should visit the doctor
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.