Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

चॉकलेट खाल्ल्याने वाढते का अ‍ॅक्नेची समस्या ?

$
0
0

पिंपल्सचा त्रास असणारे अनेकजण मुद्दामून गोडाचे पदार्थ आणि विशेषतः चॉकलेट खाण्यापासून दूर राहतात. चॉकलेट हे केवळ पिंपल होण्यामागील कारण नाही. मग नेमके कशामुळे अ‍ॅक्ने / पिंपल्स वाढतात हे जाणून घेण्यासाठी पदार्थांमधील काही विशिष्ट घटक कारणीभूत ठरतात. मग चॉकलेट खाण्याच्या ‘टेम्टेशन’वर मात करण्यासाठी ’6′ हेल्दी उपाय नक्की करून पहा

  • हाय ग्ल्यासमिक इंडेक्स –

ऑईल सिक्रेशन वाढल्यास अ‍ॅक्नेची समस्यादेखील वाढते. डरमॅटोलॉजिस्ट डॉ.शेफाली त्रासी यांच्यामते, ‘चॉकलेट्मध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स अधिक असतो. यामुळे त्वचेतील ऑईल सिक्रेशन  वाढते. परिणामी पिंपल्सचे प्रमाणदेखील वाढते.

  • साखर आणि फॅटचे प्रमाण वाढते - 

चॉकलेटमध्ये साखरेसोबतच फॅटचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे त्वचेमधील सेबमची निर्मीतीदेखील वाढते. त्यामुळे त्वचेत दाह वाढल्याने अ‍ॅक्ने वाढण्याची शक्यता बळावते.

  • हार्मोनल रिअ‍ॅक्शन - 

काही जणांमध्ये त्वचा डाएटरी आणि हेवी शुगरी पदार्थांना रिअ‍ॅक्ट करते. त्यामुळेदेखील अ‍ॅक्ने वाढण्याची शक्यता असते. काही पदार्थांमुळे शरीरात हार्मोनल बदल होतात  त्याचा परिणाम त्वचेवर झाल्यानेदेखील पिंपल्स वाढू शकतात.

इतर काही परिणामकारक घटक 

 प्रिमॅनेस्ट्युअल सिंड्रोम - 

प्रीमेनेस्ट्र्युअल चक्रामध्ये स्त्रीयांना चॉकलेट खाण्याची इच्छा अधिक होते. याचा मासिकपाळीच्या चक्रावर परिणाम होतो व अ‍ॅक्नेची समस्या वाढते.

या काळात एक्स्ट्रोजनची पातळी कमी होते.  त्यामुळे ओव्हरीजकडुन तयार होणार्‍या हर्मोन्समुळे ऑईल प्रोडक्शन वाढते. त्यामुळे मासिकपाळीचक्रात बदल झाल्याने अ‍ॅक्नेची समस्या वाढू शकते.

संबंधित दुवे -

तेलकट त्वचेसाठी 5 उपयुक्त फेसवॉश

पिंपल्स गेले पण स्कार्स कसे हटवाल ?

‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - Do chocolates cause pimples?

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>