Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

करियर आणि आरोग्य सांभाळू शकता मग ‘आई’होण्याचा निर्णय 30शीच्या पार कशाला ?

$
0
0

मातृत्व स्त्री जीवनाला पूर्णत्व देतं. पण आजकाल पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी स्त्री केवळ चूल आणि मूल या चाकोरीत बंद नाही. तिच्या कौटुंबिक जबाबदार्‍यांप्रमाणेच ‘करियर’च्या दृष्टीकोनातूनही काही आशा अपेक्षा असतात. त्या  स्वप्नांचा पाठलाग करताना लग्न आणि मूल सारेच लांबते. पण वयाच्या 35शी नंतर पहिल्या ‘गर्भारपाणा’चा निर्णय घेणे सोयीस्कर  आहे पण आरोग्यदायी नाही. यामुळे बाळाचे आणि तुमचेही आरोग्य धोक्यात येऊ शकते.

पहिले बाळंतपण लांबवण्याचे हे आरोग्यावर होणारे वेळीच लक्षात घ्या

  • वाढत्या वयानुसार  फर्टीलीटी कमी होते -:   

वाढ्त्या वयानुसार ओव्हरीजमध्ये तयार होणार्‍या अंड्यांची संख़्या कमी होते. त्यामुळे तुम्ही जितकाउशीर कराल तितके तुम्ही इन्फरलिटीकडे अधिक झुकाल. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर तयार होणार्‍या अंड्यांची क्षमतादेखील खालावते. तसेच वयाचा विशिष्ट टप्पा पार  केल्यानंतर शरीरात होणार्‍या बदलांमुळे बाळ होण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. पण तुम्हांला ‘बाळ’ कसे होते हे ठाऊक आहे का ?

  • बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात 

आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सोयीसुविधांमुळे बाळाचा विचार करण्यामध्ये वय हा अडथळा येण्याची शक्यता कमी झाली आहे. परंतू बाळामध्ये काही जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता कमी होत नाही. डाऊन सिड्रोमसारख्या जेनेटीक आजारांप्रमाणेच गर्भपात होण्याची शक्यताही वाढते. अनेक केसेसमध्ये गर्भारपणाचा निर्णय उशीरा घेणे  हे बाळाला डाऊन सिंड्रोम जडण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे ( नक्की वाचा - गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज !)

  • प्रसुतीच्या वेळेस त्रासदायक ठरू शकते:

वाढ्त्या वयाचा प्रसुतीदरम्यान त्रास होऊ शकतो. वयानुसार गर्भाशयदेखील जुने होते. तिशीतल्या वयाच्या स्त्रीयांचे गर्भाशय तरुणींइतके कार्यक्षम राहत नाही. तसेच गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात ही काळजी अवश्य घ्या ?

  • आरोग्य बिघडते :

वाढत्या वयानुसार, जीवनशैलीनुसार मधूमेह,रक्तदाबासारखे काही आजार जडू शकतात. अशा शारिरीक व्याधींमुळे गर्भधारणा होण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच तुमच्या पहिल्या बाळामध्ये काही जेनिटीक आजार असल्यास दुसर्‍या मुलामध्येदेखील अशा आजारांची 25 % शक्यता असते. त्यामुळे अशावेळेस दुसर्‍या बाळाचा विचार करण्याआधी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.

करीअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याची हेळसांड  करू नका. गरोदर स्त्री म्हणजे कामाच्या ठिकाणी ‘लेस प्रोडक्टीव्ह’ असा पुरूषप्रधान संस्कृतीचा समज आहे. पण तोच पुसण्यासाठी राधिका आपटे अभिनित एक अ‍ॅडफिल्म नक्की पहा..


video Source –  Myntra

संबंधित दुवे 

यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !!

गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’

छायाचित्र सौजन्य – Myntra

Translated By  -  Dipali Nevarekar

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles