Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

रात्री झोपेच्या वेळेस केस बांधावेत की मोकळे सोडावेत ?

$
0
0

दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर अनेकजणी केसांचा आंबाडा बांधून घरातल्या कामाला लागतात. पण असेच केस बांधून तुम्ही रात्री झोपता का ? केस बांधून झोपल्याने केसगळतीची समस्या वाढते  असे काहीजण मानतात तर केस मोकळे ठेवल्यानेही गुंता वाढतो. मग अशावेळी नेमके काय करावे ? हा प्रश्न तुम्हांला पडलाय ? मग सेलिब्रिटी मेकअप आर्टीस्ट पायल बालसे यांनी दिलेला हा खास सल्ला नक्कीच तुम्हांला मदत करू शकेल.

रात्री झोपताना केस मोकळे ठेवावेत की त्याची वेणी बांधावी  हे व्यक्तीपरत्वे बदलते. झोपताना केस मोकळे ठेवणे त्रासदायक नाही मात्र यामूळे केस गुंतण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सैलसर वेणी किंवा आंबाडा बांधावा. पण तुमच्या केसानुसार ते कसे सांभाळावेत हे सविस्तरपणे वाचण्यासाठी या खास टीप्स -:

  • स्ट्रेट केस असल्यास -

तुमचे केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनीटेल बांधून ठेऊ शकता. म्हणजे ते सकाळी फ्रिझी होत नाहीत. सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही.  तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील.

तुमचे केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. पण खूप वेळ आणि घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक आहे.

  • केस कुरळे असल्यास –

तुमचे केस कुरळे असतील तर डोक्यावर त्याचा आंबाडा बांधा  किंवा एका बाजूला बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्या. पण तो खूप घट्ट बांधू नका.

  • केस ओले असताना ते मूळीच बांधून  ठेऊ नका. परंतू केसांमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी  तुम्हांला ते बांधून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर ते 80 % सुकल्यानंतरच बांधा. यामुळे ते तुटण्यापासून बचावतील.  हाच नियम ब्लो ड्रायसाठीदेखील लागू होतो. शक्य असेल तर नैसर्गिकरित्याच सुकवण्याचा प्रयत्न करा.

संबंधित दुवे - 

केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Should I leave my hair open or tie it up while I sleep?

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles