हस्तमैथुन ( Masturbation) हे सेक्श्युयल ताणतणाव कमी करण्याचा किंवा सेक्सची इच्छा पूर्ण करण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे एकदा लग्न झाले की, हस्तमैथून करण्याची गरज भासत नाही असा गैरसमज आहे. पण लग्नानंतरही हस्तमैथून करणे हे अगदीच सामान्य आहे. यामुळे तुम्ही तुमच्यावरील सेक्सश्युअल ताणतणाव कमी होतो.
सेक्स करण्याइतकेच हस्तमैथूनदेखील आरोग्यदायी आहे. पण तुम्हांला हस्तमैथून करावेसे का वाटते याचा कधी विचार केला आहे का ?
हस्तमैथून करावेसे वाटण्यामागील कारणं -
- फारशा कष्टाशिवाय ऑर्गॅझमचा आनंद घेता येतो.
- काही वेळ एकांतात घालवावासा वाटणे
- काही समस्या सतावत असल्यास
त्यामुळे तुम्हांला कारण उमगले की तुमच्या साथीदाराला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. हस्तमैथून करणे हे आरोग्यदायी असले तरी काही चूकांमुळे ते त्रासदायकही ठरू शकते. तुम्ही साथीदाराच्या मदतीनेदेखील हस्तमैथून करू शकता. यामध्ये एकमेकांच्या शरीराला स्पर्श करणे, एकत्र ऑर्गझम मिळवण्यासाठी एकत्र येणे. पहा हस्तमैथून करण्याचे काही आरोग्यदायी फायदे
हस्तमैथून केवळ पुरूषाशी निगडीत विषय नाही म्हणूनच स्त्रियांनी हस्तमैथूनाचा आनंद कसा घ्यावा हे जाणून घेण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.
संबंधित दुवे –
स्त्रियांमध्ये हस्तमैथुनाचा परिणाम मासिकपाळीवर होतो का ?
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Is masturbation after marriage normal? (query)
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.