Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

केवळ शारिरीक नाही तर मानसिक समस्यांचाही वेळीच निचरा करा : अमृता सुभाष

$
0
0

दर्जेदार आणि निखळ कार्यक्रमांनी रसिकांचे मनोरंजन करणार्‍या ‘झी मराठी’वाहिनीने आता मनोरंजनासोबतच सामाजिक क्षेत्रातही हातभार  लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आज चूल आणि मूल इतकेच स्त्रीचे कार्यक्षेत्र सीमित नसून ती आपल्या कक्षा रुंदावत आहे. यामध्ये तीला ‘साथ स्वतःला स्वतःची’ करून देण्यासाठी ‘झी जागृती’ हा विनामुल्य उपक्रम झी मराठीने सुरू केला आहे.

‘आरोग्य’ या पहिल्या आणि महत्त्वाच्या विषयापासून या उपक्रमाची सुरवात झाली आहे. याविषयी ‘झी जागृती’ची ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडर अभिनेत्री अमृता सुभाष हिने दिलेला हा खास सल्ला आणि काही टीप्स – :

  • स्त्रियांनी स्वतःसाठी वेळ ठेवायला शिका - 

स्त्री ही घराचा आधार  असते. त्यामुळे आयुष्याच्या ट्प्प्यावर बदलत्या नात्यांनुसार तिचे प्राधान्यक्रम बदलत जातात. मग अशातही तिने स्वःतासाठी काही वेळ राखून ठेवणे गरजेचे आहे. असे अमृता सांगते. यावेळामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (नक्की वाचा   किचनमध्ये पोळ्या करता -करता कसा कराल व्यायाम ? )

  • व्यायाम आणि ध्यान – अमृताच्या फीटनेसचा मूलमंत्र 

‘व्यावसायिक आणि कौटुंबिक जाबबदार्‍या सांभाळताना आज स्त्रीला स्मार्ट आणि नियोजनबद्ध होणे गरजेचे आहे. त्यानुसार मी न चुकता सकाळी जिममध्ये जाते.  मोकळ्या हवेत किमान 20-45 मिनिटे वॉक घेते. निसर्गाच्या सानिध्यातला वेळ मला स्वतःला फार रिफ्रेश करतो. यासोबतच काही वेळ ध्यान करणे हा देखील माझ्या दिनक्रमातील महत्त्वाचा भाग आहे.’ असे अमृता सांगते.

  •  ध्यान – सकारात्मकतेचा आधार 

ध्यान / मेडीटेशन या विषयी सामाजात अनेक गैरसमज आहे. अनेकजण त्याचा संबंध अध्यात्माशी किंवा देवाशी लावतात. मात्र अमृता ध्यानसाधनेला खूप सकारात्मकतेने घेते. शरीराचा रस्ता मनातून जातो त्यामुळे नकारात्मक विचारांना बाहेर टाकण्यासाठी ‘ध्यान’ हा उत्तम मार्ग आहे असे अमृता मानते. श्रद्धेचा भाग म्हणून केल्या जाणार्‍या प्रार्थनेतून कृतज्ञता व्यक्त होते तसेच स्वतःलाच स्वतःशी असलेली समीकरणं स्पष्ट होण्यास मदत होते असा अमृताचा विश्वास आहे. त्यामुळे ध्यानसाधना अमृताच्या दिवसातील एक अविभाज्य घटक आहे.

  • डाएटचे वेड नाही 

घरच्या खाण्यावरच अमृता समाधानी आहे. त्यामुळे मन मारून जगणं किंवा डाएट करणं हे तिला मूळीच पसंत नाही. कामानिमित्त बाहेर फिरताना किंवा शूटींग सेटवरदेखील घरचा डब्बा नेणं ती पसंत करते. गोडाचे पदार्थ, फळं हे अमृताच्या पसंतीचे असले तरीही चहा -कॉफी सारखी उत्तेजित पेय  टाळते. तर  मद्यपान आणि धुम्रपान टाळण्यासोबतच धुम्रपान करणार्‍या व्यक्तींचाही राग येतो  असे अमृता सांगते. मैत्री, प्रेम आणि सिगारेट … , पण प्रेमात खरचं सारं माफ असतं ?

  • केवळ शारिरीक नाही तर मानसिक ताणही शमवणे आपली जाबाबदारी 

आपण शारिरीक व्याधीं, इंन्फेशन्सबाबत फार दक्षता पाळतो. मात्र त्यासोबतीने मानसिक संतुलन सांभाळणेदेखील तितकेच गरजेचे आहे. आपण एकतर भविष्यात धावत असतो किंवा भूतकाळातच अडकून पडलेलो असतो. मग नेमके ‘आज’ कधी आणि कसं जगायचं हे जाणून घेण्यासाठी मला मानसोपचाराचा फायदा होतो असे अमृता सांगते. मानसोपचार फक्त ‘वेड्यां’साठी किंवा ‘शॉक’पुरता मर्यादीत नाही तर ते जीवनाचा आनंद घेण्यासाठी मदत करते.

आपल्या मानसिक ताण तणावांचा इतरांना फटका न बसणं ही व्यक्ती म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्याचा वेळीच निचरा करणेदेखील आवश्यक आहे. त्यामूळे मानसोपचारातज्ञांच्या मदतीने वेळीच समस्या सोडवा. जाणून घ्या डीप्रेशन बाबत या 8 इंटरेस्टिंग गोष्टी

  • अमृताचं ‘New Year resolution 2016

मनाकडे आणि आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देणं आणि सेलिब्रिटी फीटानेट एक्सपर्ट शैलेश परुळेकर सरांनी दिलेल्या सायकलवरून अधिकाधिक फिरणं. अधिक लांब सायकलिंग करणं.

संबंधित दुवे -

PCOS च्या या ’7′ लक्षणांकडे दुर्लक्ष मूळीच करू नका !

या डाएट टीप्सने कमी करा ‘मोनोपॉज‘चा त्रास !


 

छायाचित्र सौजन्य – Zee Marathi

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>