Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पोषक असले तरीही ‘सोया’युक्त पदार्थ अति खाणे धोकादायक…

$
0
0

सोया आहारात घेणे फायदेशीर आहे. असा सल्ला तुम्ही अनेकदा ऐकला किंवा वाचला  असेल. परंतू पोषक पदार्थांचा आंधळेपणाने आहारात  समावेश केल्यास त्याचा त्रास देखील होऊ शकतो. सोयाबीन किंवा सोयायुक्त पदार्थांमधून शरीराला प्रोटीन घटकांचा पुरवठा होतो. शाकाहारींना प्रोटीनचा पुरवठा करणारा हा एक उत्तम मार्ग आहे. परंतू सोयाबीनमध्ये आयसोफ्लावोनेस (isoflavones) हे अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक व फायटोएस्ट्रोजन (phytoestrogens) अधिक आढळतात. हे घटक मानवी शरीरात इस्ट्रोजनप्रमाणे काम करत असले तरीही ते वनस्पतींमधून येतात. फायटोएस्ट्रोजन (phytoestrogens) चा शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे.

1.पुरूषांच्या ‘सेक्स लाईफ’वर परिणाम होतो : 

डॉ.नेहा सन्वाल्का ( पी.एच.डी हेल्थ सायन्स)  यांच्या मते, सोयाबीनचे अतिसेवन केल्यास पुरूषांच्या सेक्सलाईफ़मध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.  सोयाबीनच्या अतिसेवनाने  टेस्टेसटेरॉनची पातळी कमी होऊ शकते. तसेच कामवासना आणि शुक्राणूंची संख्या कमी झाल्याने फर्टिलीटी प्रॉब्लेम होऊ शकतात.

2. थायरॉईडच्या कार्यात बिघाड होतो  :

काही अभ्यासातून पुढे आलेल्या अहवालाच्या आधारे सोयाबीनमध्ये आढळणार्‍या  आयसोफ्लावोनेस (isoflavones) घटकाचा थायरॉईडच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे त्याच्या ऑबझॉर्पशनच्या कार्यात बिघाड होण्याची दाट शक्यता आहे. थायरॉईडची समस्या असलेल्यांमध्ये तसेच आयोडीनचा आहारात समावेश अधिक असणार्‍यांनी सोयाबीन व सोयायुक्त पदार्थ जपूनच खावेत. अन्यथा हायपोथायरॉईडइझम (hypothyroidism) चा त्रास जडण्याची शक्यता अधिक आहे.

3. मूतखड्याचा त्रास संभवू शकतो :
सोयाबीनमध्ये ऑक्सालेट्स घटक मुबलक आढळतात. जे मूतखडा / किडनीस्टोन्सच्या निर्मीतीस कारणीभूत ठरतात. आहारातून ऑक्सलाईट घटक शरीरात गेल्यास त्याचे विघटन न होता ते मूत्रनार्गातून बाहेर पडतात. मात्र त्याचा कॅल्शियमसोबत संबंध आल्यास त्याचे खडे तयार होतात. त्यालाच किडनी स्टोन किंवा मूतखडा म्हणतात. म्हणूनच अतिप्रमाणात सोयाबीन खाणे टाळा. ( नक्की वाचा : टोमॅटो खाणे खरचं वाढवते का ‘किडनी स्टोन’ची समस्या ?)

संबंधित दुवे - 

किडनी विकाराच्या या ’12′ लक्षणांना दुर्लक्षित करू नका!

 


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  3 reasons you should think twice before eating too many soy products

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles