उन्हाच्या झळा बसत असताना ग्लासभर नारळाचं पाणी तुम्हांला दिलासा देते. शरीरात थंडावा निर्माण करणार्या नारळाच्या पाण्याचे काही आरोग्यदायी गुणधर्मदेखील आहेत. शरीरात पित्त वाढले असताना नारळाचे पाणी प्यायल्यास त्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. मळमळ, छातीतील जळजळ कमी होण्यास मदत होते.
कसे ठरते फायदेशीर ?
नारळाचे पाणी प्यायल्यास शरीरातील अॅसिड घटकांचे अल्कलाईनमध्ये रुपांतर होण्यास मदत होते. परिणामी अॅसिडीटीचा त्रास शमवण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असल्याने पित्ताचा त्रास उलटण्याची शक्यता कमी होते. तसेच पोटात थंडावा निर्माण झाल्याने जळजळ कमी होण्यासही मदत होते.
कसा कराल हा उपाय ?
पित्ताचा त्रास रोखण्यासाठी जेवल्यानंतर अर्धातासाने ग्लासभर नारळाचे पाणी प्यावे.
पोषणयुक्त आहारासोबत नियमित जेवणानंतर 2-3 महिने नारळ्याचे पाणी प्यायल्यास पित्ताचा त्रास कायमस्वरूपी आटोक्यात राहण्यास मदत होईल. सोबतच पचनही सुधारेल. असा सल्ला आहारतज्ञ नेहा चंदना देतात. पित्ताचा त्रास कमी करण्यसोबतच त्वचेचे सौंदर्य सुधारण्यासही नारळ्याचे पाणी फायदेशीर आहे.
सौंदर्य सुधारण्यासोबतच नारळाचे काही आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. मग नारळ्याच्या दूधाचे फायदे पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा
संबंधित दुवे -
‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी !
पित्ताचा त्रास कमी करण्याचे 5 घरगुती उपाय
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Sourece - Acidity troubling you? Drink some coconut water
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.