किडनीमध्ये मिनिरल सॉल्ट म्हाणजेच कॅल्शियम आणि साचून राहिल्यास त्याचे मूतखड्यामध्ये रुपांतर होते. मूत्रवाहिनीतून छोटे तुकडे आणि टाकाऊ घटक सहज बाहेर पडतात परंतू मोठे खडे बाहेर पडू शकत नसल्याने ते अडकून वेदना होतात. या त्रासावर काही नैसर्गिक उपाय आहेत. त्यापैकी सहज सोपा घरगुती उपाय म्हणजे – लिंबाचा रस ( लेमेनेड थेरपी)
किडनी स्टोनवर कसा आहे ‘लिंबू’ प्रभावी ?
- लिंबामध्ये मुबलक प्रमाणात ‘सायट्रिक अॅसिड’ असल्याने किडनी स्टोन विरघळ्यास मदत होते.
- लिंबाच्या रसामुळे किडनी स्टोन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.
- नेहमीच्या पाण्याऐवजी लिबूपाणी पिणेदेखील आरोग्यास हितकारी आहे. हे पेय नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करते. तसेच विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
टीप -
लिंबाचा रस पाण्यात मिसळावा व आवश्यकतेनुसार त्यात साखर घालून लिंबू-सरबत बनवावे. परंतू अति साखरेचा वापर टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किडनीस्टोनच्या रुग्णांनी 5-6 कप लिंबूपाणी प्यावे. तसेच किडनीविकाराच्या या ’12′ लक्षणांना दुर्लक्षित करू नका.
References:
- Cure for Kidney Disease By V.T.
- Shriganesh R. Barnela et al. Medical management of renal stone
संबंधित दुवे -
किडनीविकारांना दूर ठेवा या ’10′ उपायांनी !
Translated By - Dipali Nevarekar
Source -Try lemonade or lime juice therapy to get rid of kidney stones
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.