Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गाजराने वाढवा केस आणि त्वचेचे सौंदर्य !

$
0
0

स्वादिष्ट गाजरामध्ये मुबलक प्रमाणात बिटा-केरोटिन, अँटि-ऑक्सिडंट्स, मिनरल्स व ‘व्हिटॅमिन ए’ हे घटक असतात. गाजर आपले त्वचा, डोळे, दात, केस आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी अतिशय आरोग्यदायी असते. मग जाणून घ्या, गाजरामुळे आपल्या त्वचा व केसांचे आरोग्य कसे सुधारते ?

गाजराचे त्वचेसाठी आरोग्यदायी फायदे –

गाजरामध्ये मुबलक प्रमाणात ‘व्हिटॅमिन ए’ असल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून आपले संरक्षण होते व त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

  • गाजराचा आहारात समावेश केल्यास त्यातील अँटि-ऑक्सिडंट्स व ‘व्हिटॅमिन ए’मुळे त्वचा तुकतुकीत व आरोग्यदायी राहण्यास मदत होते. किसलेले गाजर किंवा गाजराचा रस कोणत्याही सोयीस्कर फेसपॅकमध्ये मिसळावा. किसलेल्या गाजरामध्ये मध मिसळून घरच्या घरी फेसपॅक बनवू शकता. हा फेसपॅक चेहऱ्याला लावून १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.
  • दररोज गाजराचा रस प्यायल्याने त्वचेवरील चट्टे व डाग कमी होण्यास मदत होते. तुम्ही गाजराचा थेट किसही चट्टे व डागांवर लावू शकता. गाजराचा किस चट्टे व डागांवर लावून सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवावा.
  • गाजरामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असल्याने शरीरातील कोलॅजेनचे उत्पादन वाढण्यास मदत होते.  कोलॅजेन या प्रोटिन्समुळे त्वचा तुकतुकीत होण्यास मदत होते.दररोजच्या आहारात गाजराचा समावेश केल्यास मुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होऊन वाढते वय लपवण्यास मदत होते. ‘व्हिटॅमिन ए’ हा अँटि-ऑक्सिडंट असल्याने फ्री रॅडीकल्सचे प्रमाण कमी होऊन त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचेची कांती उजळण्यास मदत होते.
  • गाजरामधील बिटा-केरोटिन हे आपल्या त्वचेसाठी अनुकूल असून, यामुळे शरीराला ‘व्हिटॅमिन ए’चा पुरवठा होतो. याचा त्वचेच्या पेशी सुधारण्यास मदत होते.
  • गाजरातील कॅरेटोनोड्स व अँटि-ऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे सूर्याच्या घातक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते व सनबर्नच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. फिजिशियन्सच्या मते, उन्हाळ्यात गाजराचा रस प्यायल्याने सूर्याच्या उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
  • शरीरातील पोटॅशियमच्या कमतरतेमुळे त्वचा शुष्क होऊ लागते. गाजरामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्याने दररोज गाजर खाल्यास त्वचेला ओलसरपणा येऊन त्वचा मॉश्चराइज होते.

गाजरामुळे मुरमं, दाह, पुरळं अशा अनेक प्रकारच्या त्वचारोगांपासून त्वचेचे संरक्षण होते. कापलेल्या जागी, जखमेवर किंवा आग होत असल्यास त्यावर गाजर लावल्यास लवकर आराम मिळतो.

गाजराचे केसांसाठी आरोग्यदायी फायदे –

गाजरामुळे केस दाट होऊन त्यांची चांगली वाढ होते, हे अनेक जणांना ठाऊक असेल. ‘व्हिटॅमिन ए’ मुबलक प्रमाणात असल्याने गाजर केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

  • गाजरामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन ते दाट, चमकदार, लांबसडक व मजबूत होण्यास मदत होते. दररोज गाजराचा रस प्यायल्यास केस निरोगी राहण्यास मदत होते.
  • दररोज गाजराचा रस प्यायल्यास केस वाढण्यास मदत होते. गाजरामधील व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘इ’मुळे टाळूमधील रक्तभिसरण सुधारून अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.

अशा प्रकारे गाजरामध्ये त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. गाजर खाण्यासाठी मर्यादा नसल्याने ते कच्चे खावे किंवा त्याचा रस बनवून प्यावा.

गाजराचा आहारात समावेश करण्याचे पर्याय –

कच्चे गाजर खाणे किंवा रस पिण्याबरोबरच हेही काही पर्याय वापरून पहा.

  • तुम्हांला गाजराचा रस आवडत असल्यास, तुम्ही तो इतर कोणत्याही आरोग्यदायी रसामध्ये मिसळून पिऊ शकता.
  • तुम्ही गाजर सलाडमध्ये मिसळून खाऊ शकता.
  • तुम्ही गाजर घरगुती डिप किंवा आल्मंड बटर बरोबरोरही खाऊ शकता.
  • रात्रीच्या जेवणाबरोबर गाजर भाजून खाऊ शकता.
  • रावस माशाबरोबर तुम्ही वाफवलेले गाजर खाऊ शकता.

त्वचा व केसांच्या आरोग्याबरोबरच गाजरामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच, कँसरपासून संरक्षण होण्यास मदत होते, रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते, रोगप्रतिकारक क्षमता वाढतेपचनास सहाय्य होते. त्यामुळे दररोजच्या आहारात गाजराचा समावेश केल्यास त्वचा, केस आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

संबंधीत दुवे -

चमकदार त्वचा व केसांसाठी घरीच बनवा मधाचे हे ’6′ पॅक्स

लसणामध्ये दडले आहेत 5 सौंदर्यवर्धक गुणधर्म !!

त्वचेची कांती आणि केसांचे सौंदर्य वाढवणारा गुणकारी ‘आवळा’!

Translated by – Lina Bhalke

Source – Skin and hair benefits of carrots

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>