Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

उपवास विशेष रेसिपी : केळाच्या साटोऱ्या

$
0
0

उपवासाला बऱ्याचदा तिखट पदार्थ बनवले जातात. पण त्याबरोबर एखादी स्विटडिश असली तर मजा येईल ना ! म्हणूनच या एकादशीला तिखट फराळाबरोबर केळ्याच्या या गोड सारोट्या बनवायला विसरू नका.

साहित्य –

  • केळी
  • गूळ
  • राजगिऱ्याच्या लाह्या
  • राजगिऱ्याचे पीठ
  • शिंगाड्याचे पीठ
  • ओले खोबरे
  • साजूक तूप

कणीक भिजवण्याची कृती -

  • राजगिऱ्याचे व शिंगाड्याचे पीठ थंड पाण्यात भिजवावे.
  • साटोऱ्या खुसखुशीत होण्यासाठी पीठ भिजवताना थोडेसे तूप घालावे.

सारणाची कृती -

  • एका पॅनमध्ये गुळाचा पाक करून घ्यावा.
  • केळ्याचे काप करून त्याच घालावेत.
  • केळी शिजल्यानंतर त्यात राजगिऱ्याच्या लाह्या व ओले खोबरं मिसळावे.
  • हे मिश्रण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये पसरवून ठेवावे.

साटोऱ्या तयार करण्याची कृती –

भिजवलेल्या कणकेची पारी करून त्यात सारण भरावे.

सारण भरलेल्या साटोऱ्या अलगद लाटून घ्याव्यात.

पॅनमध्ये तूप गरम करून सारोट्या शॅलोफ्राय कराव्यात.

केळाच्या सारोट्यांची कृती प्रत्यक्ष पाहण्यासाठी खालील व्हिडियोवर क्लिक करा.

छायाचित्र सौजन्य – Zee  marathi

Video Source – Zee  marathi / You tube channel

संबंधीत दुवे –

उपवास विशेष रेसिपी : कंदमुळांची टिक्की

उपवास विशेष रेसिपी : राजगिऱ्याचा डोसा

आषाढी एकादशी विशेष : हेल्दी आणि टेस्टी ‘मूगडाळीची खीर’

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles