टॅनपासून बचावण्यासाठी किंवा थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्हांला बंद शूज घालणे भाग आहे का ? पण अनेकांमध्ये पायाला घाम येण्याची समस्या सर्रास आढळते. यामुळे पायाला दुर्गंधी येण्याची शक्यता असते. बंद शूजप्रमाणेच सॅन्डल घालणार्या अनेकींमध्ये पायाला घाम आल्याने त्यावर बॅक्टेरियाची वाढ होण्याची शक्यता असते. अशावेळी साबण आणि गरम पाण्याने पाय धुणे पुरेसे नसेल तर त्यावर घरगुती उपाय म्हणजे ‘लव्हेंडर तेल’. यामुळे पायाला येणार्या दुर्गंधीपासून सुटका होते.
कसे वापराल लव्हेंडर ऑईल -
- बादलीभर कोमट पाण्यात काही थेंब लव्हेंडर ऑईल मिसळावे.
- यामध्ये 20-25 मिनिटे पाय बुडवून बसा.
- टॉवेलच्या सहाय्याने पाय नीट कोरडे करून घ्या. नंतर त्यावर लाईट मॉईशचरायझर लावून हलका मसाज करावा.
- नियमित काही दिवस हा प्रयोग करावा.
याशिवाय,
- रात्री झोपण्यापूर्वी लव्हेंडर ऑईलने हलकासा मसाज करावा.
- रात्रभर सॉक्स घालून झोपावे.
कसे आहे लव्हेंडर ऑईल फायदेशीर -
- लव्हेंडर ऑईलमध्ये उत्तम सुवास तर आहेच पण त्यातील अॅन्टिबॅक्टेरिअल घटक पायांवरील बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत करतात.
- लव्हेंडर ऑईलमधील अॅन्टि फंग़ल घटक पायाला येणार्या दुर्गंधी रोखण्यास मदत करतात.
टीप:
लव्हेंडर ऑईल वापरण्यापूर्वी छोटी पॅच टेस्ट अवश्य करून बघा. म्हणजे तुम्हांला रिअॅक्शनची वेळीच जाणीव होईल.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Here’s a surefire, natural way to get rid of smelly feet
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.