Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हिवाळ्यात सांध्यांचे दुखणे रोखण्यासाठी खास ’6′टीप्स !

$
0
0

हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. मात्र संधीवाताच्या रुग्णांना या थंडीच्या दिवसात त्रास होण्याची शक्यता अधिक असते. ऋतूमानात झालेल्या बदलामुळे सर्दी-पडशाचा त्रास, व्हायरल इंफेक्शन फारच लवकर शरीराचा ताबा घेतो. वातावरणात खालावणार्‍या  पार्‍याबरोबर सांध्यांचे दुखणे मात्र वाढण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच संधिवाताच्या रुग्णांनी स्वतःच्या आहारविहारात काहीसे बदल करणे आवश्यक आहेत.  अंगदुखीची ही ’10′ कारणं देतात तुम्हांला आजाराचे संकेत म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करू नका.

वोकहार्ट हॉस्पिटल वाशी येथील जॉईंट रिपलेसमेंट सर्जन डॉ. शैलेंद्र पाटील यांच्यामते, ‘ हिवाळ्यात सूर्यप्रकाशाचे प्रमाण नियंत्रित असल्याने अनेक रुग़्णांना या दिवसांमध्ये त्रास होण्याचे प्रमाण अधिक असते. याबरोबरच रक्तप्रवाहाच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यासही सांधे स्टिफ (जड) होतात. हाडांच्या कमजोरतेमुळे सांध्याचे दुखणे वाढते. ‘ म्हणूनच आरोग्याबाबत थोडी काळजी घेतल्यास आरोग्याचे हे दुखणे नियंत्रणात राहण्यास मदत होते.

  • आरोग्यदायी आहार घ्या :

पोषक आणि आरोग्यदायी आहार यामुळे अनेक शारिरीक व्याधी दूर ठेवण्यास मदत होते. म्हणूनच चौकस आणि संतुलित आहाराचा  समावेश करा. पुरेशा पालेभाज्या, डाळी, दुग्धजन्य पदार्थ, ऋतूमानानुसार उपलब्ध होणार्‍या फळांचा आस्वाद अवश्य घ्या.  सांधेदुखीचा त्रास कमी करणारे हे ‘हेल्दी घरगुती पेय’ नक्कीच वेदना कमी करण्यास मदत करते.

  • व्हिटामिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा :

गुडघेदुखी किंवा संधीवाताच्या रुग्णांनी या दिवसात व्हिटामिन सी, डी, के आणि मिनरल्सयुक्त पदार्थांची निवड अधिक करावी. प्रामुख्याने कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात असणे आवश्यक आहेत. पालक, कोबी, टोमॅटो, संत्र यामधून व्हिटामिनच्या सोबतीने शरीराला मिनरल्सचादेखील पुरवठा होतो. व्हिटामिन्समुळे बोन कार्टीलेज आणि टिश्यूच्या निर्मीतीला चालना मिळते.  केवळ दूधातून नाही तर या ’5′ भाज्यांमधून मिळवा ‘कॅल्शियम’

  • नियमित व्यायाम करा :

स्ट्रेचिंग आणि हलका व्यायाम गुडघ्यांचे दुखणे असणार्‍या रुग्णांसाठी फायदेशीर  असतो. सायकलिंग, चालणे, अ‍ॅरोबिक्स, स्विमिंग अशा व्यायामप्रकारामुळे गुडघ्याचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. तसेच त्याची हालचाल सुधारण्यास मदत होते.  ( नक्की वाचा: योगासनांनी कमी करा संधिवाताच्या वेदना)

  • थंड पाण्याची आंघोळ टाळा :

वातावरणात थंडावा असताना थंड पाण्याने आंघोळ करणे अधिक त्रासदायक ठरु शकते. यामुळे गुडघेदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे कोमट किंवा गरम पाण्याने आंघोळ करणे अधिक फायदेशीर ठरते. गरम पाण्यामुळे गुडघ्यांचे अवघडलेपण, सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

  • सूर्यप्रकाशात बसा :

सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशाचा आनंद जरूर घ्या. यामुळे दिवसाची प्रसन्न सुरवात तर होईलच पण सोबतच सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हा एक नैसर्गिक उपचारदेखील ठरेल. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यामुळे शरीरात व्हिटामिन डीच्या निर्मितीस चालना मिळते. तसेच शरीरातील रक्ताभिसरणाची क्षमता सुधारते.

  • ताठ बसा :

सांध्यांचे दुखणे वाढण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे कामाच्या ठिकाणी चुकीच्या स्थितीत बसणे किंवा अवजड वस्तू हाताळताना घाई करणे. थंडीच्या दिवसात दुखणे अधिक त्रासदायक होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीत हालचाल करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.

संबंधित दुवे - 

संधिवाताच्या रुग्णांसाठी 9 सुपरफुड्स !!

मोहरीने करा ‘सांधेदुखी’वर मात

एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source -  6 tips to prevent joint pain during winter

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>