वजन घटवण्यासोबतच कॅन्सरचा धोका कमी करण्यास, त्वचेचा पोत सुधारण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करणारा ‘ग्रीन टी’ हे एक वंडर ड्रिंक आहे. ग्रीन मधील अॅन्टीऑक्सिडंट घटक मेटॅबॉलिझमला चालना देऊन फॅट्सचे विघटन करण्यास मदत करतात. तसेच वेळी-अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते. पण केवळ कपभर ग्रीन टी ने ही किमया कशी होणार ? पण अति ग्रीन टी पिणेदेखील त्रासदायक ठरू शकते. मग पहा नियमित किती ग्रीन टी पिणे आहे आरोग्यदायी
आहारतज्ञ प्रिया काथपाल यांच्यानुसार नियमित साखरविरहित 4-5 कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामधून शरीराला मुबलक मॅगनीज, क्रोमियम,झिंक अशी मिनरल्स शरीराला मिळतात. मेरिलॅन्ड मेडीकल सेंटरच्या अहवालानुसार 4 कप ग्रीन टीमधून शरीराला वजन आटोक्यात ठेवणारी मुबलक कम्पाऊंड्स मिळतात. या ’6′ कारणांसाठी आजपासून नक्की प्या ‘ग्रीन टी’
वजन घटवण्यासाठी केवळ ग्रीन टीवर अवलंबून राहणे फायद्याचे नाही. यामुळे केवळ वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. यासोबतीने योग्य आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. वजन घटवायचयं ? मग जेवणाआधी खा हे ’3′ पदार्थ !
नियमित ग्रीन टी पिण्यापूर्वी या काही टीप्स अवश्य लक्षात ठेवा -
- निद्रानाशाची समस्या असल्यास किंवा कॅफिन घटकांचा तुम्हांला त्रास होत असल्यास चार कपांपेक्षा अधिक ग्रीन टी पिणे त्रासदायक ठरू शकते.
- गरोदर स्त्रिया किंवा त्यासाठी प्रयत्न करणार्या स्त्रियांमध्ये ग्रीन टीचे सेवन हे प्रमाणातच असणे हितकारी आहे. अशा स्त्रियांनी ग्रीन टी टाळणे किंवा 2 कप पिणे हेच हितकारी आहे.
- किडनी विकार किंवा लिव्हरचा त्रास असल्यास ग्रीन टी पिणे टाळा.
- जेवणासोबत ग्रीन टी पिणे टाळा. यामुळे अन्नातील आयर्न ग्रहण करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – How many cups of green tea should you drink in a day to lose weight?
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.
वजन घटवायचयं ? मग जेवणाआधी खा हे ’3′ पदार्थ !