मेष -:
ग्रहांची स्थिती पाहता, या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील. मात्र काही अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनं चालवताना, जिन्यावरून चढ-उतार करताना काळजी घ्या. काही लहानसे दुखणे पुन्हा डोके वर काढू शकते. त्यामुळे अल्टरनेटीव्ह उपायांनी त्यावर मात करा.
वृषभ -:
घशात खवखव जाणवणे, दातदुखी अशा समस्या या आठवड्यात त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करा. दिवसभरातील कामांमध्ये मध्यमवयीन लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशामधून इजा होण्याची शक्यता आहे.
मिथून- :
रात्रीचे जागकरण केल्याने पचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी काही हलके व्यायाम अवश्य करावा. तसेच पुरेशी झोप घेणे तुम्हांला आवश्यक आहे. वाढ्त्या वयानुसार आरोग्याची अधिक काळजी घ्या. निरोगी स्वास्थ्यासाठी जीवनात काही आरोग्यदायी बदल करा.
कर्क – :
तुमच्या राशीतील ग्रहांची स्थिती पाहता काही जुने विकार पुन्हा नव्याने डोकं वर काढू शकतात. त्यामुळे त्यामधील गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच काळजी घ्या. मधूमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी औषाधांच्या वेळा पाळणे गरजेचे आहे. नियमित हलके व्यायाम, ध्यानसाधना करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सिंह -:
या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील. मध्यामवयीन लोकांनी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी आहाराच्या वेळा पाळा, पुरेशी झोप घ्या, व्य्सनं सोडा तसेच तुमच्या फीटनेसकडे विशेष लक्ष द्या.
कन्या -:
तुमच्या राशीतील 8व्या स्थानावर केतूचा प्रभाव असल्याने तुमच्या स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. जुन्या व्याधींवर लक्ष ठेवा. तसेच ते वाढू नये म्हणून काळजी घ्या. निरोगी स्वास्थ्यासाठी स्वतःचा फीटनेस वाढवण्याकडे अधिक लक्ष द्या. व्यायाम करा.
तूळ -:
आरोग्याच्या दृष्टीने गुरूचा प्रभाव अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. काही जुन्या समस्यांवर कायमस्वरूपी औषध मिळण्याची शक्यता आहे. काही लहान सहाँ समस्या उदभवण्याची शक्यता आहे. मध्यमवयीन व त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी अधिक शारिरीक परिश्रम करणे टाळावे. मात्र व्यायाम म्हणून चालणे फायदेशीर ठरते.
वृश्चिक -:
पचनाच्या समस्या असल्या तरीही त्या फार त्रासदायक ठरणार नाहीत. मात्र फार काळ समस्या राहिल्यास योग्य उपचार करावेत. मध्यमवयीन तसेच त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी मधूमेह तसेच रक्तदाबाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नये.
धनू -:
तुम्हांला सांधेदुखी अथवा श्वसनाच्या विकारांचा त्रास असल्यास त्यावर प्रतिबंधक उपाय वेळीच करावेत. म्हणजे त्याची तीव्रता वाढणार नाही. इतरांचे आरोग्य ठीकठाक राहील. मात्र यामुळे आरोग्य गृहीत धरून चालू नका. आहाराचे पथ्य आणि व्यायाम याकडे दुर्लक्ष करू नका.
मकर -:
सांधेदुखी, अस्थमाचा त्रास असलेल्या मध्यमवयीन लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. या समस्या या आठवड्यात अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. लहान-सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याही गंभीर होण्याची शक्यता आहे. फीटनेस राखण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक आहे.
कुंभ -:
सर्दी-पडशाचा त्रास वगळता तुम्ही या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील. सांधेदुखीसारख्या दीर्घकाळ चालणार्या समस्येवर तुम्ही या आठवड्यात मात करू शकता. त्यामुळे काही अल्टरनेटीव्ह उपायांनी त्यापासून कायमची सुटका मिळवा.
मीन -:
या आठवड्यात आरोग्यविषयक समस्या उद्भवणार नाहीत. मात्र हे गृहित धरून आरोग्याची हेळसांड करू नका. योग्य आहार घ्या आणि व्यायाम करा. यामुळे तुमचे आरोग्य सुधारण्यास आणि अधिक स्वास्थ्यकारक होण्यास मदत होईल. पोषक आहार आणि रात्री योग्य झोप घ्या. तसेच मित्रांच्या संगतीत राहून वाईट सवयी लावून घेणे टाळा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.