आपल्या शरीरातील उर्जेला सकारात्मक दिशा देण्यासाठी हस्तमुद्रा फायदेशीर ठरतात. कोणीही, कधीही आणि कोठेही करू शकेल अशा हस्तमुद्रा आपले मानसिक आणि शारिरीक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. ‘वायुमुद्रा’ ही अशांपैकीच एक ! वायुमुद्रेमुळे मन स्थिर आणि चेतासंस्था शांत करण्यास मदत करतात. या मुद्रेमुळे स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. तसेच हार्मोनल असंतुलन कमी होते. वायुमुद्रेमुळे मेंदूचे कार्य आणि स्मरणशक्ती सुधारते. शरीरात वात वाढला असल्यास या मुद्रेने त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होते.
पहा कशी कराल वायुमुद्रा -
- शक्य असल्यास पद्मासनात बसा किंवा किमान पाठीचा कणा ताठ ठेवून कोठेही स्थिर बसा. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेचे मांड्यांवर ठेवा.
- तर्जनी ( पहिले बोट )चे टोक अंगठ्याच्या खालच्या बाजूला ठेवा. तर्जनीवर अंगठा ठेवा. उर्वरीत तीन बोटं ताठ ठेवा. दोन्ही हात अशाच स्थितीत ठेवा.
- या स्थितीत शांत बसून काही दीर्घ श्वास घ्या. तसेच तुमच्या श्वासावर लक्ष ठेवा.
- वायुमुद्रा नियमित 30-45 मिनिटे केल्यास फायदेशीर ठरते. मात्र सलग इतकावेळ बसणे शक्य नसल्यास दिवसातून 2-3 वेळेस 10-15 मिनिटे ही मुद्रा करावी.
- जेवण झाल्यावर ही मुद्रा केल्यास शरीरातील वायू कमी होण्यास मदत होते.
कोणतीही मुद्रा करण्यासाठी वेळेचे, जागेचे बंधन नाही मात्र सकाळच्या वेळेस करणे फायदेशीर ठरते.
संबंधित दुवे -
‘आपन मुद्रा’ – शरीर डीटॉक्स करण्याचा नैसर्गिक पर्याय !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - An easy mudra to calm your anxious mind
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.