रामायणातील गौतम ऋषी, इंद्र आणि अहिल्याची गोष्ट आपल्या परिचित असेल. याच पौराणिक कथेचा आधार घेऊन सुजय घोष दिग्दर्शित ‘अहिल्या’ ही बंगाली भाषेतील शॉर्ट फिल्म सध्या सर्वत्र चांगलीच गाजतेय. आपल्या ‘बोल्ड’ अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली राधिका आपटे ( खाण्याच्या भूकेइतकीच ‘लैंगिक भूक’देखील सामान्य :राधिका आपटे) , अभिनेता सौमित्र चॅटर्जी व तौता रॉय चौधरी यांनी यामध्ये भूमिका केल्या आहेत. 21 व्या शतकात शिक्षण, विज्ञान, माहिती व तंत्रज्ञान यासार्यांनी आपण प्रगत झालो असलो तरीही स्त्रियांकडे पाहण्याची पुरूषी मानसिकता ही अजूनही मागासलेली आहे.
सार्याच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. मात्र कामाच्या, शिक्षणाच्या ठिकाणी त्यांना मानसिक अथवा शारिरीक लैंगिक शोषणाला सामोरे जावेच लागते. स्त्रियांच्या मुक्तपणे वागण्या-बोलण्याच्या पद्धतीला ग्राह्य मानून त्यांच्याविषयीचे हे काही अंदाज बांधले जातात.
- कपड्यांची उंची – मुलींचे चारित्र्य हे त्यांच्या कपड्यांच्या निवडीनुसार ठरवले जाते. तंग, शॉर्ट किंवा सिव्हलेस कपडे घालणार्या मुली म्हणजे त्या अधिक ‘बोल्ड’ आणि ‘ओपन’ समजल्या जातात. अनेकदा मुलींचे कपडे हे मुलांना ‘अति उत्साही’ बनवतात. त्यामुळे मुलींनी मर्यादेत कपडे घालावेत असा सल्ला दिला जातो.
- मुलींचे बोलणे – भारतीय समज प्रगत होत असला तरीही मानसिकता मात्र मागासलेलीच आहे. त्यामुळे चारचौघांत मुलींनी मोठ्याने बोलणे, काही विशिष्ट शब्दांचा वापर करणे म्हणजे त्या बिघडलेल्या मुली आहेत असा समज करून घेतला जातो.
- मुलींचे ‘फ्री वागणे’ – मुलींनी कितीही शिक्षण घेतले, मोठे पद कमावले तरीही ठराविक मर्यादेपेक्षा अधिक बाहेर येऊ नये. असा पुरूषप्रधान संस्कृतीतून आलेला समज आहे. त्यांच्या उठण्या-बसण्याच्या पद्धतीतून त्यांचे चारित्र्य ठरवले जाते. नकळत झालेला स्पर्श हा मुलांना त्यांनी दिलेला संकेत वाटतो आणि त्यातून ते नकळत अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करतात.
- पार्टी – मजा-मस्ती करणे – प्रत्येकजण स्वतंत्र असल्याने त्यांच्या सोयीनुसार ते आनंद व्यक्त करण्यास मोकळे असतात, पण ‘सातच्या आत घरात’ हा नियम न पाळणार्या, मित्र-मैत्रिणींसोबत रात्री पार्टी, मजा-मस्ती करणार्या मुलींकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन हा संकुचित असतो. वेळेचे गणित पाळण्याचा नियम हा बहुतेक घरात फक्त मुलींनाच असतो.
- सांस्कृतिक बंधन न पाळणं - चूल आणि मूल हेच स्त्रीचे प्राधान्यक्रम असावेत. असा आपला सांस्कृतिक समज आहे. लग्नानंतर स्त्रीने साडी किंवा अंगभर कपडे घालावेत. कुटुंबाला प्राधान्यक्रम देऊन त्यांच्याच मर्जीत रहावे. तसे न करणार्या मुली या ‘व्यभिचारी’ समजल्या जातात.
म्हणूनच तुम्हीदेखील पहा या आधुनिक ‘अहिले’ची कहाणी !
व्हिडियो / छायाचित्र सौजन्य – LargeShortFilms
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.