अनेकांचा दिवाळीतील आवडीचा एक पदार्थ चकली ! महाराष्ट्रात अनेक प्रकारे चकली बनवली जाते. खमंग आणि खुसखुशीत असणारा हा पदार्थ तेलकट असल्याने अति खाल्याने डाएटचे बारा तर वाजतीलच पण सोबतीला पोट बिघडण्याचीदेखील शक्यता आहे. म्हणूनच यावर उपाय म्हणून केवळ चमचाभर तेलात तयार होणारी खमंग़ बेक्ड चकली तुम्ही जरूर करून पहा. त्यामुळे वेट लॉसच्या मिशनवर असणार्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
चकली बनवण्यासाठी लागणारा वेळ - 15 मिनिटे
बेकिंग टेंम्परेचर : 160°C (320°F)
अंदाजे – 12 चकल्या
साहित्य -
तांदळाचे पीठ – 1/2 कप
तेल – 1 टीस्पून
लो-फॅट दही – 1 टीस्पून
चिमूटभर हिंग
चवीपुरता मीठ
ग्रिसिंग साठी तेल
कशी बनवाल चकली ?
- तांदळाचे पीठ, तेल, हिंग व मीठ हे सारे मिश्रण एकत्र करा.
- यामध्ये दही आणि थोडेसे पाणी मिसळून त्या पीठाचा गोळा बनवा.
- पीठाचे छोटे गोळे करून चकलीपात्रात टाकून चकल्या बनवा.
- ग्रिसिंग प्लेटवर चकल्या ठेवून त्या 160°C (320°F) प्रिहीट ओव्हनमध्ये 15 मिनिटे ठेवा.
- एका बाजूला चकली गोल्डन -ब्राऊन झाली की ती उलट करून दुसरी बाजू भाजून घ्या.
- तयार चकल्या दीर्घकाळ खमंग राहण्यासाठी एअर टाईट डब्ब्यात ठेवा.
पहा या चकलीतील पोषणता -
Amt | Energy | Protein | Cho | Fat | Vit A | Vit C | Calcium | Iron | F. Acid | Fibre |
6 gm | 21 kcal | 0.4 gm | 0.4 gm | 0.4 gm | 3.8 mcg | 0.0 mg | 2.2 mg | 0.0 mg | 0.4 mcg | 0.0 gm |
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Healthy Diwali recipe: Baked chakli
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.