कॅन्सर हा एक गंभीर विकार असून तो लहान मुलांना झाल्यास जीवघेणा ठरु शकतो.या आजाराच्या उपचारांच्या वेदना मुलाप्रमाणे पालकांना देखील जाणवत राहतात.त्यामुळे रोगाच्या भितीमुळे जीवन गंभीर होते.केमोथेरपी अथवा रेडीऐशन सारख्या उपचारानंतर रोग बरा होण्याचा कालावधी देखील पालकांसाठी आव्हानात्मक असतो. मुलांमध्ये दिसणारी blood cancer ची ‘८’ लक्षणे वेळीच ओळखा
जसलोक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे Medical Oncologist And Stem Cell Transplant Physician डॉ.गणपती भट यांच्याकडून जाणून घेऊयात लहान मुलांमधील ब्लड कॅन्सरविषयी ही महत्वाची माहिती.
उपाचारादरम्यान धैर्य ठेवा.
डॉ.भट यांच्यामते इतर कॅन्सर पेक्षा मुलांमधील कोणताही ब्लड कॅन्सर हा प्रत्येक मुलामध्ये निरनिराळ्या पद्धतीचा असू शकतो.या विकाराच्या उपचारांसाठी केमोथेरपीनंतर रेडीऐशन उपचार देण्यात येतात.आजार पुन्हा बळावण्याची शक्यता वाटत असल्यास स्टेम सेल रिप्लेसमेंट थेरपीचा सल्ला देण्यात येतो.त्यामुळे पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की या उपचारांसाठी दीर्घकाळ लागण्याची शक्यता असते.त्यामुळे पालकांनी Oncologist च्या सल्लानूसार उपचार सुरु केल्यापासून दोन ते तीन वर्षांच्या काळासाठी नियोजन करणे आवश्यक असते.तसेच जाणून घ्या तुमची मुले वारंवार आजारी पडतात का?
या उपचारांसाठी तीन टप्प्यांमध्ये केमोथेरपी देण्यात येते.
Induction- ज्यामध्ये औषधोपचारांच्या सहाय्याने शक्य तितक्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.ही औषधे तोंडावाटे अथवा इंजेक्शनद्वारे देण्यात येतात.उपचारादरम्यान अशा मुलांना ठराविक कालावधी साठी औषधांचे काही ठराविक डोस घ्यावे लागतात.या औषधांचे डोस त्या मुलाला झालेल्या विकाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात.मुलांना त्यांचा विकाराच्या निदानानूसार एक अथवा अनेक औषधांचे डोस एकत्रपणे देण्यात येतात.जर कर्करोग सेंट्रल नर्व्हस सिस्टिम व पाठीच्या कण्यापर्यंत पोहचला असेल तर त्याला रोखण्यासाठी CNS थेरपी देण्यात येते.जाणून घ्या केमोथेरपीला प्रतिसाद न देणार्या कॅन्सरवर कसे केले जातात उपचार ?
Consolidation-जेव्हा काही प्रमाणात कर्करोगाची लागण झाली आहे असे आढळून येते तेव्हा त्या टप्प्यामध्ये रुग्णाला केमोथेरपी देण्यात येते.या दरम्यान औषधांचा डोस वाढवूव प्रभावित झालेल्या पेशी नष्ट करण्यात येतात.
Maintenance-या टप्प्यामध्ये Bone Marrow Testing अथवा Peripheral Blood Count च्या परिक्षणावरुन कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी किमान तीन वर्षे केमोथेरपी देण्यात येते.
रेडीऐशन-केमोथेरपी नंतर कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडीऐशन थेरपी देण्यात येते.हे उपचार सहसा कर्करोगाची लागण वाढल्यानंतर म्हणजे जेव्हा कर्करोग मेंदू,पाठीचा मणका व गुप्तांगाच्या भागात पसरुन धोका वाढतो तेव्हा देण्यात येतात.तसेच वाचा कॅन्सरचे निदान करण्यासाठी लिक्विड बायोप्सी फायदेशीर ठरते का ?
रेमिशनच्या दरम्यान सावध रहा.
रेमिशन हा असा काळ असतो ज्या काळात कर्करोगाच्या पेशी शरीरात आढळून येत नाहीत किंवा कर्करोगाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत.रेमिशन तात्पुरते अथवा कायमस्वरुपी असू शकते.असे असले तरी कर्करोग पूर्ण बरा करण्यासाठी पुन्हा उपचार सुरु करण्यासाठी हा टप्पा फार महत्वाचा असतो.म्हणूनच पांढ-या रक्त पेशी व शरीरातील इतर रक्त पेशींच्या संख्येवर लक्ष ठेवणे फार महत्वाचे आहे.अनेक लोकांना या विकाराच्या पुन्हा परतण्याची भिती वाटत असते व जे फार स्वाभाविक आहे.
असे असले तरी कमी व मध्यम प्रकारच्या कर्करोगाच्या अनेक केसेसमध्ये हा विकार पूर्णपणे व कायमस्वरुपी बरा झालेला आहे.हाय-रिस्कमध्ये विकार पुन्हा बळावण्याचा धोका असू शकतो.पण तसे झाल्यास त्वरीत उपचार करता येतात.जेव्हा उपचारादरम्यान कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे कमी अथवा नष्ट होतात त्या काळाला आपण खात्रीदायकपणे रेमिशनचा काळ असे म्हणू शकतो.जर उपचार केल्यावर काही वर्षांनी कर्करोगाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत तेव्हा आपण या विकाराचा धोका टळला असे म्हणू शकतो.यासाठी वाचा केमोथेरपीनंतर होणारे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी असा असावा तुमचा आहार !
कर्करोग पुन्हा झाल्यास कोणते पर्यायी उपचार केले जातात?
अशा स्थितीमध्ये कर्करोगाचा प्रकार व तीव्रता तपासण्यासाठी रेमिशन टेस्ट पुन्हा करण्यात येते.तसेच या स्थितीत देखील केमोथेरपी,रेडीऐशन व स्टेम सेल थेरपी करण्याचा सल्ला देण्यात येतो.या थेरपी द्वारे Cancerous Bone Marrow Cells चे रुंपातर Healthy Hematopoietic Stem Cells मध्ये केले जाते या पेशी निरोगी अस्थीमज्जेमध्ये विकसित होतात.Hematopoietic पेशी अस्थीमज्जा व रक्त यामध्ये आढळून येणारी पेशी आहे.स्टेम सेल थेरपीचे दोन प्रकार आहेत. Allogenic किंवा ALLO व Autologous किंवा AUTO.या दोन्ही प्रकारामध्ये मोठया डोससह कर्करोगाच्या पेशी नष्ट करुन त्या स्टेम सेलने रिप्लेस केल्या जातात.तसेच जाणून घ्या कसा ओळखाल त्वचेच्या कॅन्सरचा धोका !
Palliative दक्षतेची केव्हा करण्याची गरज असते ?
सामान्यत: रेमिशन नंतर स्टेम सेल थेरपी घेतल्यास ते उपचार प्रभावी ठरतात व रोग पूर्ण बरा होतो पण काही कारणात्सव केलेले उपचार सफल न झाल्यास इतर आधारात्मक दक्षता घ्याव्या लागतात.पालकांसाठी हा फार कठीण काळ असतो.बरेच जण या काळामध्ये घरामध्ये अथवा Palliative दक्षतेचे नियोजन करतात.या साठी अशा वेळी तुमच्या बाळाला कशामुळे आरामदायक वाटेल तशी व्यवस्था करा.या काळात त्याला कमीतकमी वेदना होतील याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock