चेहर्यावर पिंपल्सचा डाग राहू नये किंवा अनपेक्षितपणे पिंपल्सही येऊ नयेत म्हणून कित्येकप्रकारचे क्लिंजर वापरले जातात. चेहर्यावरील छिद्रं मोकळी आणि स्वच्छ केली जातात. पण तुम्हांला ठाऊक आहे का ? चेहर्याप्रमाणेच योनिमार्गातही अॅक्ने / पिंपल येणं हे अगदीच सामान्य पिंपल्सप्रमाणेच आहे. पण योनिमार्गात आलेल्या पिंपल्सचा त्रास आटोक्यात कसा ठेवाल त्यावर उपचार कसे कराल याबाबतचा खास सल्ला Olivia Skin and Hair Clinic, च्या डरमॅटोलॉजिस्ट डॉ. विद्या आनंद यांनी दिला आहे.
- व्हर्जायनल अॅक्नेचा त्रास का होतो ?
शरीराच्या कोणत्याही भागावर अतिप्रमाणात sebum (सेबम) ची निर्मिती झाल्यानंतर अॅक्नेची निर्मिती होते. योनिमार्गातही सेबमच्या निर्मितीचे प्रमाण वाढल्यानंतर अॅक्ने येऊ शकतो. मासिकपाळीच्या काळात काही वेळेस हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होते. यामुळेही योनिमार्गात अॅक्ने येऊ शकतात. तसेच मृत पेशी आणि बॅक्टेरियांची अतिप्रमाणात वाढ झाल्याने हा त्रास होऊ शकतो. ताण तणावाचाही आरोग्यावर परिणाम होतो. योनिमार्गात अॅक्ने वाढण्यासाठी हे देखील एक कारण असू शकते. योनिमार्गाविषयी ’6′ रोचक गोष्टी ! नक्की जाणून घ्या.
योनिमार्गामध्ये अॅक्ने वाढत असल्याचे कसे ओळखाल ?
योनिमार्गात वाढत असलेली पुळी हा अॅक्नेच आहे की इतर कोणत्याप्रकारचा त्रास किंवा फोड हे ओळखणं अनेकदा कठीण असते. चेहर्यावर जसा अॅक्ने येतो तशाच प्रकारचा अॅक्ने योनिमार्गातही येतो. इनग्रोव्हन केसांमुळे येणार्या फोडांपेक्षा योनिमार्गात येणारा अॅक्ने थोडा अधिक त्रासदायक असतो.
- डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल ?
योनिमार्गात सतत फोड, अॅक्नेचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. काही लैंगिक आजारांमध्ये अॅक्नेप्रमाणे दिसणारे फोड वाढातात. मात्र ते अॅक्ने प्रमाणे स्वतःहून ठीक होत नाहीत. लैंगिक आजारामुळे हा त्रास वाढत असेल तर योनिमार्गात खाज येणं, दुर्गंधी येणं, काही स्त्राव वाहणं असा त्रास होतो. योनीमार्गाचे आरोग्य जपण्यासाठी या ’8′ गोष्टी टाळाच
- योनिमार्गातील अॅक्नेचा त्रास कसा कमी कराल ?
योनिमार्गातील अॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठी काही टॉपिकल क्रीम्स लावू शकता. अशा प्रकारच्या क्रीममधील Azelaic acid दाह कमी करण्यास आणि डेड स्कीनचा त्रास कमी करण्यास मदत करतात. कोणत्याही प्रकारची क्रीम लावण्यापूर्वी काळजी आणि वैदयकीय सल्ला नक्की घ्या. त्वचेच्या जाडसर भागावर क्रीम लावावी. योनीमार्गातील त्वचा नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे क्रीम लावण्यापूर्वी काळजी घेणं गरजेचे आहे. योनिमार्गातील संसर्ग रोखतील हे ’4′ केमिकल फ्री पदार्थ !
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock