स्विमींग हा मुलांसाठी एक उत्तम व्यायाम प्रकार आहे.स्विमींग शिकल्यामुळे मुले केवळ पाण्यामध्ये पोहणे अथवा स्विमींगचे विविध प्रकार शिकतात असे नाही तर यामुळे तुमची मुले एक उत्तम स्पर्धात्मक तरणपटू देखील बनू शकतात.तज्ञांच्या मते जर १५ ते १८ महिने या वयातील मुलांकडून जर पाण्यात पोहण्याची पुर्वतयारी करुन घेतली तर वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत त्यांच्या पोहण्याच्या व स्ट्रोकच्या तंत्रामध्ये योग्य विकास करता येऊ शकतो.तसेच वाचा लहान मुलं स्विमींग करीत असताना काय सावधगिरी बाळगाल ?
Team Speedo च्या माना पटेल देखील अशा मुलांपैकी एक आहेत.त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी स्विमींग शिकण्यास सुरुवात केली व वयाच्या पंधराव्या वर्षी त्या बॅकॉंक मधील एशियन एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवणा-या पहिला महिला जलतरणपटू ठरल्या.त्यामुळे तुमच्या मुलांना एखाद्या समर कॅम्पमध्ये स्विमींग शिकण्यासाठी पाठविणे हे त्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने एक सुदृढ पाऊल असू शकते.
माना पटेल यांच्यामते जाणून घेऊयात स्विमींगमुळे मुलांमध्ये कोणती कौशल्ये विकसित होतात.
मुलांमधील आत्मविश्वास वाढतो-
एखाद्या स्थानिक स्पर्धेमध्ये भाग घेणे व स्ट्रोक वर्क वर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमची मुले स्विमींगच्या पुढच्या लेवलसाठी हळूहळू तयार होतात.तसेच अशा स्पर्धात्मक स्विमींगमुळे तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो,ती अधिक निरोगी रहातात व ध्येयवादी बनतात.तसेच या ‘५’ कारणांसाठी मुलांना अवश्य घराबाहेर पडून खेळू द्या !
लाईफ सेव्हींग तंत्रात मुले पारंगत होतात-
स्विमींग शिकणे हे केवळ छंद अथवा खेळ असू शकत नाही.कारण त्यामुळे तुमची मुले एखाद्याचा जीव वाचविण्याचे तंत्र देखील शिकत असतात.अगदी लहान वयामध्ये पोहणे व पोहण्याचे योग्य तंत्र शिकल्याने तुमची मुले पुढील आयुष्यात खोल पाण्यातील कोणत्याही गंभीर परिस्थितीला हाताळण्यासाठी सक्षम होतात.तसेच जाणून घ्या पोहताना मुलांच्या कानामध्ये शिरलेले पाणी बाहेर कसे काढाल ?
मुलांमधील स्टॅमिना वाढतो-
आजकालची मुले मोबाईल,टी.व्ही,टॅब अशा अनावश्यक गोष्टींवर अधिक वेळ घालवतात.त्यापेक्षा पोहणे हे त्यांना सक्रिय करण्याचे एक उत्तम साधन असू शकते.पहिली गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये जाणे हे मुलांसाठी नेहमीच उत्सुकता वाढवणारे असते.दुसरी गोष्ट म्हणजे त्यातून त्यांचा आपोआप चांगला व्यायाम होत असतो.कारण पाण्यामध्यो पोहण्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी ९० टक्कांनी कमी होते.त्यामुळे मुले न थकता त्यांचा स्टॅमिना आपोआप वाढू लागतो.तसेच काळानुसार मागे पडलेले हे ’14′ खेळ देखील आजच्या पिढीतील मुलांना नक्की शिकवा
पोहणे ही एक उत्तम कार्डिओ एक्सरसाईज आहे-
पोहल्यामुळे शरीरातील स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.त्यामुळे तुम्ही ब्रेस्ट स्ट्रोक करा अथवा बटरफ्लाय त्यामुळे तुमचा चांगला कार्डिओ एक्सरसाइज होत असतो.मुलांना पोहल्यामुळे चांगली भूक लागते व त्यांना पोषक आहार देता येतो.तसेच त्यामुळे मुलांना चांगली झोप लागते व मानसिक स्वास्थ लाभते.ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते.
आजकाल मुलांना प्रोफेशनल स्विमींग शिकवण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.भविष्यामध्ये मुलांना उत्तम तरणपटू करण्यासाठी स्विमींग कॉम्पिटीशन व इव्हेन्ट चांगले माध्यम ठरत आहेत.त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या मुलांना स्विमींग शिकवा व जगातील नवनव्या उत्कर्षाच्या संधी उपलब्ध करुन द्या.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock