Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मायग्रेन व मासिक पाळी यांचा काय संबंध असतो ?

$
0
0

मासिकपाळीमध्ये अनेक महिलांना अशक्तपणासह क्रॅम्प व वेदना सहन कराव्या लागतात.पण काही महिलांना यासोबतच मायग्रेनचा देखील त्रास जाणवतो.कधीकधी आपल्याला वाटतं की हा केवळ एक योगायोग आहे.पण जेव्हा दर महिन्याला मायग्रेनचा त्रास जाणवतो तेव्हा ही मासिक पाळीमधील एक समस्या आहे याची जाणिव होऊ लागते.यासाठी जाणून घ्या मासिकपाळीच्या वेदना हमखास दूर करणारे ’10′ नैसर्गिक उपाय !

महिलांमधील सेक्स हॉर्मोन्स व मायग्रेनचा जवळचा सबंध आहे.या मायग्रेनला Predominantly Female Disorder असे देखील म्हणतात.हा त्रास मासिक पाळीच्या एक दिवस आधी व पहिल्या दिवशी जाणवतो.काही महिलांना मासिक पाळीच्या इतर दिवशी देखील मायग्रेनचा त्रास जाणवतो.यासाठी वाचा या ’10′ कारणांमुळे वाढतो मायग्रेनचा त्रास !

या काळामध्ये महिलांच्या Oestrogen ची पातळी कमी होते त्यामुळे त्यांना मायग्रेनचा सुरु त्रास होतो.तसेच त्यामागे Prostaglandin या हॉर्मोन्सची निर्मिती देखील कारणीभूत असू शकते.

Menstrual Migraine यावर काय प्रभावी उपचार करावेत?

Nonsteroidal Anti-Inflammatory Drugs (NSAIDs)-NSAIDs शरीरातील प्रोटीन व इन्झायमी रोखून धरण्याचे काम करतात.त्यामुळे सूज व वेदना कमी होतात.मासिक पाळीतील वेदना व मायग्रेन यावर याचा चांगला परिणाम होतो.मासिक पाळीतील मायग्रेन साठी Naproxen हे औषध प्रभावी ठरते.कारण यामुळे वेदना तर कमी होतातच शिवाय प्रकाशाबाबत संवेदनशील असणे,मळमळ व डोके जड होणे अशी मायग्रेनची लक्षणे देखील कमी होतात.मायग्रेनची डोकेदुखी कमी करणा-यासाठी ‘भ्रमरी प्राणायम’ !अवश्य करा.

Estradiol-या सप्लीमेंट द्वारे Oestrogen ची पातळी कृत्रिमरित्या वाढवण्यात येते.ही पातळी वाढल्यामुळे मासिक पाळीतील मायग्रेनची समस्या देखील कमी होते.अंडाशयामध्ये Estradiol हे फिमेल हॉर्मोन निर्माण होत असते.मासिक पाळीच्या चक्रातील पहिल्या टप्प्याला Luteal Phase असे म्हणतात.ज्यामध्ये Oestrogen ची पातळी पुरेशी असते.त्यामुळे मासिक पाळीच्या काळात त्याचे प्रमाण कृत्रिमरित्या वाढवून मायग्रेनची समस्या कमी करता येते.यासाठी Estradiol Gel चा १.५ मिग्रॅ डोस घेणे फायदेशीर आहे.

Triptans-या औषधामुळे प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्या सकुंचित करुन सूज कमी करण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो.मायग्रेन हा रक्तवाहिन्या संबधित विकार असून या औषधाचा वेदना कमी करण्यासाठी फायदा होतो.यासाठी सामान्यपणे मासिक पाळीमध्ये Frovatriptan, Naratriptan, Sumatriptan व Zolmitriptan ही Triptans घेण्यात येतात.वाचा मासिकपाळी दरम्यानच्या वेदना घालवण्याचा नैसर्गिक उपाय

Magnesium-मासिक पाळी चक्राच्या १५ व्या दिवशी तोंडावाटे ३६० मिग्रॅचा डोस घेतल्यास त्याचा प्रभाव पुढील दोन महिने अथवा पुढील मासिक पाळीच्या चक्रापर्यत असू शकतो.हा महिलांना मासिक पाळी दरम्यान होणा-या मायग्रेनचा त्रास दूर करण्याचा एक प्रभावी व सुरक्षित मार्ग आहे.तसेच जाणून घ्या मासिकपाळीच्या दिवसांत हे ’6′ पदार्थ टाळाच !

Combined Hormonal Contraceptives-या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये Ethinyloestradiol व Progestogen या एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या संयुक्त हॉर्मोन्स चा समावेश असतो.या गोळ्यांमुळे शरीरातील Oestrogen ची पातळी नियंत्रित रहाते व त्यामुळे मायग्रेनचा त्रास होत नाही.यासाठी महिलांना एक आठवडा असक्रिय गोळ्यांसह पुढील तीन आठवड्या या गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा सल्ला देण्यात येतो.जाणून घ्या गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

Progestogen-Only Contraceptive-वरील संयुक्त गर्भनिरोधकांचा मासिक पाळीतील मायग्रेन वर चांगला प्रभाव पडत असला तरी त्यामुळे रक्तवाहिन्यांना धोका असू शकतो.विशेषत: जर त्या महिलेला मायग्रेनचा त्रास होत असेल तर या गोळ्यांमुळे अशा पस्तिशीनंतरच्या महिलांना स्ट्रोकचा धोका असू शकतो.जर त्या महिला धुम्रपान करीत असतील,त्यांना उच्च रक्तदाबाची अथवा मधूमेहाची समस्या असेल तर हा धोका अधिक असतो.त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मायग्रेनचा त्रास रोखण्यासाठी Progestogen-Only Contraceptive वापरणे फायदेशीर ठरते.जाणून घ्या गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो का ?

तसेच वाचा आल्याचा काढा – मायग्रेनच्या त्रासावरील गुणकारी उपाय

संदर्भ-

1.1. Scher AI, Stewart WF, Lipton RB. Migraine and headache: a meta-analytic approach. In: Crombie IK, Croft PR, Linton SJ, et al., editors. In Epidemiology of Pain. Seattle: IASP Press; 1999. pp. 159–170
2. MacGregor, E. A., & Hackshaw, A. (2004). Prevalence of migraine on each day of the natural menstrual cycle. Neurology, 63(2), 351-353.
3. MacGregor, E. A., Frith, A., Ellis, J., Aspinall, L., & Hackshaw, A. (2006). Incidence of migraine relative to menstrual cycle phases of rising and falling estrogen. Neurology, 67(12), 2154-2158.
4. Martin, V. T. (2004). Menstrual migraine: a review of prophylactic therapies. Current pain and headache reports, 8(3), 229-237.
5. Allais, G., Bussone, G., De Lorenzo, C., Gabellari, I. C., Zonca, M., Mana, O., … & Benedetto, C. (2007). Naproxen sodium in short-term prophylaxis of pure menstrual migraine: pathophysiological and clinical considerations. Neurological Sciences, 28(2), S225-S228.
6. MacGregor, E. A., Frith, A., Ellis, J., Aspinall, L., & Hackshaw, A. (2006). Prevention of menstrual attacks of migraine A double-blind placebo-controlled crossover study. Neurology, 67(12), 2159-2163.
7. Tuchman, M. M., Hee, A., Emeribe, U., & Silberstein, S. (2008). Oral Zolmitriptan in the Short-Term Prevention of Menstrual Migraine. CnS drugs, 22(10), 877-886.
8. Facchinetti F, Sances G, Borella P, Genazzani AR, Nappi G. Magnesium
prophylaxis of menstrual migraine: effects on intracellular magnesium. Headache.
1991 May;31(5):298-301. PubMed PMID: 1860787.
9. MacGregor, E. A. (2007). Menstrual migraine: a clinical review. The journal of family planning and reproductive health care/Faculty of Family Planning & Reproductive Health Care, Royal College of Obstetricians & Gynaecologists, 33(1), 36.
10. Chumnijarakij, T., Sunyavivat, S., Onthuam, Y., & Udomprasertgul, V. (1984). Study on the factors associated with contraceptive discontinuations in Bangkok. Contraception, 29(3), 241-249.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>