दिलेल्या तारखेनुसार किंवा ठरवल्याप्रमाणे प्रसूतीवेदना चालू होतील आणि प्रसूती होईल असे नाही. साधारणपणे प्रसूतीवेदना दिलेल्या तारखेच्या आसपास चालू होतात. तर काही महिलांना प्रसूतीवेदना येत नाहीत. गर्भातील बाळाच्या वाढीवर जवळून लक्ष देऊन १४ दिवसात प्रसूतीवेदना चालू होतील असा सल्ला डॉक्टर देतात. परंतु, ही शक्यता गरोदरपणात जास्त समस्या, कॉम्प्लिकेशन्स नसल्यास दिसून येते. जर डॉक्टरांनी सांगितलेल्या तारखेनुसार प्रसूतीवेदना चालू न झाल्यास आणि गर्भातील बाळाला काही इजा पोहचत असल्यास तुम्हाला प्रसूतीवेदना येण्यासाठी प्रयत्न केले जातात किंवा सिझेरियन केले जाते.
खूप उशीर होण्यापूर्वी अनेक स्त्रिया नैसर्गिकरीत्या प्रसूतीवेदना येण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु, या प्रयत्नांना काहीजणींना यश येते तर काहींना नाही. परंतु, ब्रेस्ट आणि निप्पल मसाज केल्याने नैसर्गिक प्रसूती होण्यास मदत होते. २०१४ च्या BioMed Research International journal च्या अभ्यासात ब्रेस्ट आणि निप्पल मसाज करण्याचे फायदे सांगितले आहेत.
नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी योनीमार्ग पुरेसा खुला होणे गरजेचे असते. त्यामुळे बाळ गर्भातून बाहेर येण्यास मदत होते. परंतु, नैसर्गिक प्रसूती न होण्याचे मुख्य कारण म्हणजे cervix प्रसूतीच्या दिवसापर्यंत नीट खुला होत नाही. पहिल्यांदाच गरोदर राहिलेल्या महिलांमध्ये आधी १-२ प्रसूती झालेल्या महिलांच्या (सिझेरियन न होता नैसर्गिक झालेल्या महिलांच्या) तुलनेत हा त्रास अधिक दिसून येतो. नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स
- गरोदरपणात ब्रेस्ट मसाज कसा फायदेशीर ठरतो ?
अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, पिट्युटरी ग्रंथीतून oxytocin ची निर्मिती होते. यामुळे cervix मोकळा होण्यास मदत होते व नैसर्गिक प्रसूती होण्यास चालना मिळते. ज्या गरोदर स्त्रीला मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपोथायरॉईजम किंवा इतर मेडिकल समस्या नसतात, त्यांना याचा जास्त फायदा होतो. प्रसूतीमध्ये काही धोका असल्यास अधिक लक्ष देण्याची गरज असते. तसंच प्रसूतीवेदना उशिरा सुरु झाल्यास त्यावर वेळीच इलाज करणे आवश्यक असते. गरोदरपणात ब्रेस्ट मसाज करणे गरजेचे आहे का ?
नैसर्गिक प्रसूती होण्यास ब्रेस्ट मसाजचा काही फायदा होतो की नाही हे जाणून घेण्यासाठी ३६-३८ आठवड्याच्या गरोदर असणाऱ्या २०० स्त्रियांवर प्रयोग करण्यात आला. या महिलांचे २ गट करून एका गटास ब्रेस्ट मसाज कसा करायचा ते शिकवण्यात आले आणि दुसऱ्या गटाला काही न करता फक्त देखरेखीखाली ठेवण्यात आले. मसाज करायला सांगितलेल्या महिलांना मसाज करण्याचे तंत्र शिकवण्यात आले. मसाज करण्यासाठी तुम्ही कोणतेही घरगुती तेल वापरू शकता. हा मसाज एका बाजूला १५-२० मिनिटे याप्रमाणे दिवसातून तीनदा करण्यास सांगितले. या ४ कारणांसाठी सिझेरियन डिलीव्हरीचा निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा.
एका आठवड्यानंतर दोन्ही गटातील महिलांची तपासणी करण्यात आली. त्यात असे दिसून आले की, मसाज करणाऱ्या गटातील महिलांची नैसर्गिक प्रसूती होण्याची शक्यता ब्रेस्ट मसाज न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक होती. सिझेरियन करण्याची गरज मसाज न करणाऱ्या गटातील महिलांना मसाज करणाऱ्या महिलांच्या तुलनेत तीनपट अधिक होती. प्रसूतिवेदना उशिरा येण्याचे प्रमाण मसाज न घेणाऱ्या महिलांमध्ये दुसऱ्या गटातील महिलांपेक्षा अधिक होते. प्रसूतीपूर्वी रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण मसाज न करणाऱ्या महिलांमध्ये ६% जास्त होते. परंतु, ब्रेस्ट मसाज घेणाऱ्या महिलांना हा त्रास झाला नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाळ गर्भातून बाहेर येताना दोन्ही गटात दिसलेला फरक. सिझेरियन प्रसुतीची निवड कोणत्या कारणांमुळे करावी लागते ?
अभ्यासातून असेल दिसून आले आहे की, पहिल्यांदाच गरोदर राहिलेल्या महिलांसाठी ब्रेस्ट मसाज करणे कमी धोक्याचे असून त्यामुळे प्रसूतीवेदना वेळेत चालू होतात.
- काय करणे योग्य ठरेल ?
नैसर्गिक प्रसूती होण्यास प्राधान्य देत असाल तर घरच्या घरी ब्रेस्ट मसाज करा. त्यामुळे cervix ओपन होण्यास मदत होईल. परंतु, जर तुमच्या गर्भारपणात काही समस्या, कॉम्प्लिकेशन्स असतील तर मसाज करणे टाळा. तसंच, अति मसाज केल्यास प्रसूतीवेदना लवकर येण्याची शक्यता असते. सुलभ प्रसुतीसाठी ही योगासनं ठरतील अधिक फायदेशीर !
Reference: Singh, N., Tripathi, R., Mala, Y. M., & Yedla, N. (2014). Breast stimulation in low-risk primigravidas at term: does it aid in the spontaneous onset of labour and vaginal delivery? A pilot study. BioMed research international, 2014
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock