मेष-(२१ मार्च ते २० एप्रिल)-आरोग्याबाबत चिंता असलेल्या लोकांना या आठवड्यामध्ये सर्व ग्रहांच्या एकत्रित असलेल्या अनुकूल स्थितीतून एखादी चांगली आरोग्यवार्ता समजेल.त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील.मात्र पचनसमस्या होण्याची शक्यता आहे.पचनक्रिया सुरळीत रहावी यासाठी खाण्याच्या सवयी बदला.स्ट्रेचिंग एक्सरसाईजचा चांगला फायदा होऊ शकतो.
वृषभ-(२१ एप्रिल ते २१ मे)-पचनक्रिया मंदावल्यामुळे आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.समस्या गंभीर होण्याआधीच योग्य ते औषधोपचार करा.पचनसंस्था सुधारण्यासाठी व दीर्घकालीन आरामासाठी घरगुती उपाय करा.मसालेदार पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा.तसेच जाणून घ्या जेवणानंतर पान,बडीशेप,वेलची का खावी?
मिथुन-(२२ मे ते २१ जून)-या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याला कोणताही धोका नाही.तुमचे नियमित वॉकला जाणे व पोष्टिक आहार घेणे याचे हे सुपरिणाम आहेत.यासाठी या चांगल्या सवयी सोडू नका.मात्र पचन समस्येचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.असे झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या व औषधोपचार करा.
कर्क-(२२ जून ते २२ जुलै)-या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहिल.त्यामुळे आरोग्याबाबत फार काळजी करण्याचे कारण नाही.मात्र जर तुम्हाला पूर्वी श्वसनसमस्या झालेली असेल तर तो त्रास पुन्हा वर येण्याची शक्यता आहे.त्यावर त्वरीत उपचार करा.
सिंह-(२३ जुलै ते २२ ऑगस्ट)-हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्य व स्वास्थाचा असेल.त्यामुळे तुम्हाला या आठवड्यामध्ये शारीरिक व मानसिक अशा छोट्या अथवा मोठ्या अशा कोणत्याही आरोग्य समस्या होणार नाहीत.जर तुम्हाला जूना एखादा आजार नसेल तसेल तर तुम्हाला आरोग्याबाबत काळजी करण्याची गरज नाही.
कन्या-(२३ ऑगस्ट ते २२ सप्टेबर)-अनेक ग्रह एकाच वेळी तुमच्या राशीच्या १२ व्या घरात आल्यामुळे त्याचे तुमच्या आरोग्यावर प्रतिकुल परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.त्यामुळे याबाबत सावध रहा.एखाद्या आरोग्य समस्येची लक्षण दिसू लागली त्वरीत त्यावर उपचार करा.
तूळ-(२३ सप्टेबर ते २२ ऑक्टोबर)-तुमच्या राशीतील ग्रहांच्या अनुकूल दिशेमुळे या आठवड्यामध्ये तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ उत्तम राहील.भविष्यात तुम्हाला कोणताही आरोग्य धोका नाही.सर्दी-खोकल्यासारख्या छोट्या आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.त्यावर अॅन्टीबायोटीक्स घेण्याऐवजी घरगुती औषधोपचार करा.
वृश्चिक-(२३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर)-कामाच्या अति ताणामुळे तुम्हाला थकवा येऊन तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.शारीरिक व मानसिक स्वास्थासाठी थोडावेळ निवांतपणासाठी देखील काढा.ताणामुळे तुमची पचनसंस्था मंद होऊन आरोग्य समस्या होण्याची शक्यता आहे.यासाठी रात्री उशीरा व जड जेवण घेणे टाळा.रोजच्या जीवनात येणारा ताण दूर करण्यासाठी एक्स्पर्ट टीप्स !
धनु-(२३ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर)-सांधेदुखीची समस्या असलेल्या लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे.मधूमेहींनी जाणिवपूर्वक गोड खाद्यपदार्थ व पेय घेणे टाळावे.ब्लड शूगर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित चेक-अप करा.
मकर-(२२ डिसेंबर ते २० जानेवारी)-जरी हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यस्वास्थाचा असेल तरी तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे.अॅसिटीडीच्या समस्येमुळे तुम्हाला आठवडाभर अस्वस्थ वाटेल.या त्रासातून आराम मिळावा यासाठी अॅन्टासिड घेण्याऐवजी आहारामध्ये कच्च्या भाज्या व फायबरयुक्त धान्यांचा समावेश करा.भरपूर पाणी पिल्याने देखील चांगला आराम मिळेल.तसेच जाणून घ्या या ‘५’ कारणांसाठी, जेवताना पाणी पिणे टाळा
कुंभ-(२१ जानेवारी ते १८ फेब्रुवारी)-ग्रहदिशेवरुन तुम्हाला या आठवड्यामध्ये व्हायरल इनफेक्शन होऊन घरी आराम करावा लागण्याची शक्यता दिसत आहे.त्यामुळे याबाबत प्रचंड सावध रहा व उपचार करा.डॉक्टरांचा सल्ला घ्या व पुरेशी झोप घ्या.यासाठी जाणून घ्या झोप कमी येण्याची ही काही कारणे
मीन-(१९ फेब्रुवारी ते २० मार्च)-जर तुम्हाला श्वसन समस्या असेल तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका.लवकर एखाद्या चांगल्या स्पेशलीस्ट कडून उपचार करुन घ्या.वायू प्रदूषणापासून दूर रहा.अस्थमा अटॅक टाळण्यासाठी ताण-तणावात्मक परिस्थिती टाळा.तसेच वाचा या ’7′ कारणांमुळे तुम्हांला सतत दम लागतो !