प्रत्येक स्त्री ला महिन्यातून एकदा पाळी येते. काहींना २-३ दिवस तर काहीजणींना ५ किंवा त्याहून अधिक दिवस रक्तस्त्राव होतो. परंतु, मासिक पाळी व्यतिरिक्त काही वेळेस हलकसं ब्लीडींग होतं. त्याला स्पॉटिंग म्हणतात. मासिकपाळी येऊन गेल्यानंतर जर स्पॉटिंग झालं तर लवकर पिरियड आले असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे ब्रेकथ्रू ब्लीडींग असू शकते. आणि मासिकपाळीच्या मध्ये स्पॉटिंग होण्यामागे अनेक कारणे आहेत. ताण, गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये केलेला बदल यामुळे स्पॉटिंग होते. परंतु, पिरियड ब्लीडींग आणि स्पॉटिंग मधला नेमका फरक कसा ओळखावा ? यावर बंगलोरच्या Cloudnine Hospital चे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बी. वेंकट यांनी मार्गदर्शन केले. मासिकपाळी की गर्भपात – नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ?
रक्तस्त्राव योग्य प्रमाणात झाला की पाळी आल्याचे कळते. त्यामुळेच पिरियड ब्लीडींग (मासिक पाळीत होणारा स्क्तस्राव) आणि ब्रेकथ्रू ब्लीडींग मधील फरक समजण्यास मदत होते. स्पॉटिंग म्हणजे अगदी कमी होणारा रक्तस्त्राव. यामध्ये रक्तस्राव होण्याचे प्रमाण कमी असून ते खूप दिवस होत नाही. मासिकपाळीतील स्त्राव आठवडाभर किंवा ५ दिवस होतो. तर स्पॉटिंग फक्त दोन दिवसच होते. म्हणून स्पॉटिंग होत असल्यास एक्सट्रा पॅड वापरण्याची गरज नाही. मासिकपाळीत 5 दिवसांपेक्षा अधिक रक्तस्त्राव होण्याची ७ कारणे !
- हे ब्लीडींग कधी होते?
जर तुमचे मासिक पाळीचे चक्र सुरळीत असले आणि त्याव्यतिरिक्त तुम्हाला ब्लीडींग होत असेल तर ते स्पॉटिंग असण्याची शक्यता आहे. या ‘७’ कारणांमुळे मासिक पाळीत नेहमीपेक्षा कमी रक्तस्त्राव होतो !
- गर्भनिरोधक गोळ्या बदल्यास हा त्रास होतो:
काही वेळेस नवीन गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरवात केल्यास स्पॉटिंग होते. विशेषतः गोळ्या बदल्यानंतर पहिले काही दिवस हा त्रास होतो. त्याचबरोबर मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेत असाल तर तुम्हाला ब्रेकथ्रू ब्लीडींग होण्याची शक्यता आहे. तसंच गर्भनिरोधक गोळ्या घेणे राहून गेल्यास (विसरल्यास) देखील स्पॉटिंग होते. म्हणून, गर्भनिरोधक गोळ्या वेळेवर घ्या. मासिकपाळी पुढे ढकलणार्या गोळ्या घेण्यापूर्वी जाणून घ्या त्याबाबत या ’10′ गोष्टी
ब्रेकथ्रू ब्लीडींग जर सातत्याने होत असेल तर मात्र शरीरात काय बदल होत आहेत हे जाणून घेण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock