Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मधुमेह असल्यास प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा पावडर घेणे योग्य आहे का ?

$
0
0

मधुमेहींना खाण्याची खूप पथ्य असतात. कोणताही पदार्थ अगदी तो हेल्दी असला तरी खाण्यापूर्वी त्यांना दोनदा विचार करावा लागतो. प्रोटीन सप्लिमेंट किंवा पावडरच्या बाबतीत देखील तेच होते. बाजारात उपलब्ध असणाऱ्या पावडर, सप्लिमेंट्स मध्ये साखर, केमिकल्स असतात. त्याचा रक्तातील साखरेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रोटीन सप्लिमेंट्समुळे अॅक्नेची समस्या उद्भवते का ?

परंतु, तुम्ही जर ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी जिमला जात असाल तर तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याकडे योग्य लक्ष देणे गरजेचे आहे. प्रोटिन्समुळे जिममध्ये डॅमेज झालेले स्नायू पुन्हा बिल्ड होतात. म्हणून वर्कआऊटनंतर प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी अनेकजण प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा शेक बनवण्यासाठी मिळणाऱ्या पावडरचा वापर करतात. परंतु, तुम्हाला जर मधुमेह असेल तर प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याआधी विचार करा. बाजारात शुगर फ्री प्रोटीन सप्लिमेंट्स उपलब्ध असतात. त्या मधुमेहींसाठी हेल्दी आणि सुरक्षित असतात, असे मुंबईच्या Advanced Multispecialty Hospital च्या डायबेटॉलॉजिस्ट डॉ. नीती शहा यांनी सांगितले. म्हणून जर तुम्हाला मधुमेह असेल तर डॉक्टर किंवा न्यूट्रीशियनिस्ट यांच्या सल्ल्याने प्रोटीन सप्लिमेंट किंवा पावडरची निवड करा. तुम्हाला कार्ब्सची अधिक गरज असल्याचे संकेत देतात या ‘३’ गोष्टी !

वर्कआऊटनंतर प्रोटीन सप्लिमेंट्स घेताना या काही गोष्टी लक्षात ठेवा:

  • जर तुम्हाला मधुमेह असेल तर वर्कआऊटनंतर कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि प्रोटिन्स युक्त पदार्थ खा. व्यायामानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. कॉम्प्लेक्स कार्ब्स शरीराला ऊर्जा मिळेल व साखरेचे प्रमाण सुरळीत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रोटीन सप्लिमेंट्समुळे डॅमेज झालेले स्नायू बिल्ड व्हायला मदत होईल. कॉम्प्लेक्स कार्ब्स घेण्यासाठी मल्टी ग्रेन सँडविच आणि उकडलेली रताळी हा उत्तम पर्याय आहे. जीम प्रोटीन्स घेणं योग्य की अयोग्य ?
  • माणसाच्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे ०. ८ gm प्रोटिन्सची आवश्यकता असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीची प्रोटीनची गरज वेगवेगळी असते. परंतु, त्याचा अतिरेक धोकादायक ठरेल. मधुमेहाबरोबर किडनीच्या समस्या असल्यास प्रोटीनच्या अतिरिक्त प्रमाणामुळे समस्या अधिक गंभीर होईल. प्रत्येक जेवणातून किती प्रमाणात प्रोटीन घेणे गरजेचे आहे ?
  • परंतु, किडनीचे विकार नसल्यास आणि तुम्ही जिममध्ये वर्कआऊट करत असाल किंवा मसल बिल्डसाठी ट्रेनिंग घेत असाल तर तुम्हाला शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे २ gm प्रोटीनची आवश्यकता असते. साधारणपणे, वर्कआऊटनंतर १५-३० gm प्रोटीन असलेले प्रोटीन शेक घेणे योग्य ठरेल. आहारात प्रोटीन्स अधिक प्रमाणात घेतल्याने बद्धकोष्ठता होते का ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>