Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

व्यायाम, डाएट पाळूनही वजन का वाढतयं ?

$
0
0

मी पंचवीस वर्षीय तरूणी आहे. मी खाण्यावर ताबा ठेवला, डाएट काटकोरपणे फॉलो केले तरीही वजन कमी जास्त होते. डाएट सोबत व्यायामही नियमित केला जातो. पण याचा माझ्या वजनावर कोणताच सकारात्मक परिणाम  होत नाही. माझं वजन इतके प्रयत्न करूनही का वाढते ?

या समस्येवर गोल्ड जिमचे फीटनेस एक्सपर्ट सागर पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे.

तुमच्या शरीराच्या गरजेनुसार डाएट प्लॅन करा. आहार चौकस राहील याकडे लक्ष द्या. यामध्ये भरपूर भाज्या, लीन प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स यांचा समावेश करा. यामुळे भरपेट खाण्यापेक्षा तुम्हांला तृप्त वाटायला हवे. तुम्ही ब्रोकोली खा, मासे खा किंवा अगदी चिकन खा… पण तुम्हांला कधी थांबायचं.. किती खायचं हे तुम्हांलाच ठरवायला हवे ..  हळूहळू आणि नीट चावून चावून खा.

वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तुमच्या आहारात सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट्स,कोलेस्ट्रेरॉल,साखर, मीठ कमी असणारे, पदार्थ निवडा. कॅलरी मोजत राहू नका. त्याऐवजी फॅट्स आणि साखरयुक्त पदार्थांचा समावेश कमी करा. म्हणजे वजनच नाही तर तुमचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते.

केवळ वजन घटवण्यापेक्षा तुमच्या फीटनेसकडे अधिक द्या – तुमच्या शरीराचे स्वास्थ्य जितके चांगले, फीट ठेवता येईल तेवढा तुम्हांलाच फायदा होणार आहे. तुम्हांला व्यायाम करण्यासाठी अधिक उर्जा मिळेल. अधिक मोठ्या ध्येयांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकाल. केवळ वजन घटवायचयं म्हणून जीममध्ये जाऊ नका. वजन घटवण्याच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा.

स्ट्रेन्थ / स्वतःचे बळ वाढवा – स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा व्यायाम घटवलेले वजन टिकून राहण्यास मदत होते.  कारण जीममध्ये व्यायाम केल्यानंतरही शरीरातील फॅट बर्निंगची प्रक्रिया चालू असते.

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>