दाक्षिण्य खाद्यसंस्कृतीमध्ये सांबार, रसम विशिष्ट प्रकारे बनवले जातात. त्याची चव खुलवण्यासाठीही विशिष्ट प्रकारचे लहान कांदे वापरले जातात. साध्या कांद्यांच्या तुलनेत हे सांबाराचे लहान कांदे उग्र चवीचे किंवा वासाचे नसतात.त्यामुळे ते कच्चेही खाणं फायदेशीर ठरतात.
सांबाराचे हे लहान कांदे स्वाद सुधारण्यासोबतच स्वास्थ्यकारकदेखील आहेत. म्हणूनच Fortis Hospital, BG Road, Bangalore च्या प्रमुख आहारतज्ञ शालिनी अरविंद यांनी दिलेला हा खास सल्ला आणि सांबाराच्या कांद्यांचे हे आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या.
- chronic diseases वर प्रभावी - सांबाराच्या कांद्यामध्ये flavonols आणि polyphenolic घटक मुबलक आहेत. कांदा, लसणाच्या तुलनेत सांबारातील कांद्यामध्ये यांचे प्रमाण अधिक असते. Flavonols हे एक बायोअॅक्टीव्ह कमाऊंड आहे. यामुळे अनेक chronic diseases चा धोका कमी होतो.
- कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात – शरीरात Low-density lipoprotein चे प्रमाण वाढले की त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. atherosclerosis चा धोका बळावतो. यामध्ये रक्तवाहिन्या कडक आणि निमुळत्या होतात. लसुण आणि कांद्याप्रमाणे सांबाराचे लहान कांदे चिरून खाल्यास त्यामध्ये Allicin ची निर्मिती होते. यामुळे LDL cholesterol चे प्रमाण आटोक्यात ठेवण्यास मदत होते. या ’9′ पदार्थांमध्ये मूळीच नाही कॉलेस्टेरॉल
- रक्ताभिरण सुधारते – शरीराची संपूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीम सुधारायला सांबाराचे कांदे मदत करतात. यामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत होते. यामुळे रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते. सांबाराच्या कांद्यामध्ये आयर्न आणि कॉपर घटक मुबलक असतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. लाल रक्त पेशींची निर्मिती सुधारते.
- मधूमेहींना फायदेशीर - allium आणि allyl disulfide हे दोन्ही फायटोकेमिकल्स सांबाराच्या लहान कांद्यांमध्ये आढळतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !
- इतर फायदे – सांबाराच्या लहान कांद्यामध्ये Quercetin आणि Kaempferol, घटक आढळतात. यामधील अॅन्टीऑक्सिडंट घटक,flavonol quercetin अवयवांना असलेला कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.यासोबतच डाएटरी फायबर्स, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम,व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6 आणि मॅग्निज यांचा देखील मुबलक साठा असतो.
म्हणूनच सांबार किंवा दाक्षिण्य पदार्थ बनवत असाल तर आवर्जून सांबाराचे लहान कांदे वापरा. यामुळे तुमच्या पदार्थांची चव आणि स्वाथ्यही देखील सुधारेल.टेस्टी सांबारचे ’5′ हेल्दी फायदेदेखील नक्की जाणून घ्या.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock