स्त्री मेक-अप केल्यामुळे अधिक आकर्षित व सुंदर दिसते.त्यामुळे प्रत्येक स्त्री सण-समारंभातच नाही तर अगदी रोजच्या रुटीनमध्ये देखील दररोज हलकासा मेक-अप करीत असते.पण पावसाळ्यामध्ये तुमचा हा मेक-अप काही मिनीटांमध्येच खराब होतो.त्यामुळे पावसाळी दिवसांमध्ये मेक-अप करणे आव्हानात्मक असते.यासाठी जाणून घ्या पावसाळ्यातही ‘ब्युटीफूल’ राहण्यासाठी शहनाझ हुसेन यांच्या खास टीप्स !
Panache Salon and Academy चे फाउंडर आणि डायरेक्टर सतीश सराफ यांच्याकडून जाणून घेऊयात पावसाळी दिवसामध्ये मेक-अप दीर्घकाळ टिकावा यासाठी प्रायमर,मॉश्चराइजर व फाउंडेशन लावण्याचा योग्य मार्ग.
प्रायमर-पावसाळ्यात प्रायमर चेह-यावर लावणे फार आवश्यक आहे.जर तुमच्याकडे प्रायमर नसले तर या पावसाळ्यामध्ये मेक-अप करण्यासाठी ते जरुर विकत घ्या.गुळगुळीत टेक्शर यावा यासाठी मॉश्चराइज वापरण्यापूर्वी पाच मिनीटे थांबा.तसेच यासाठी जाणून घ्या झटपट टीप्स – घरच्या घरी चेहरा स्वच्छ कसा कराल ?
सूचना-ओल्या प्रायमर बेसवर काहीही लावल्यास त्याचा फायदा होत नाही.आयशॅडो व लिपस्टिक उठावदार दिसण्यासाठी पापण्या व ओठांवर सुद्धा प्रायमर जरुर लावा.तसेच वाचा त्वचेच्या रंगानुसार कशी निवडाल लिपस्टिकची शेड !
मॉश्चराइजर-सौम्य क्लिनझरने त्वचा निरोगी ठेवा व त्वचेवर मॉश्चराइजर लावण्यास विसरु नका.पावसाळ्यामध्ये हेवी मॉश्चराइजर वापरण्याची गरज नाही.याउलट तुम्ही पावसाळ्यामध्ये हलके,वॉटरबेस मॉर्श्चराइजर व सिरम वापरु शकता.तसेच यासोबत वाचा त्वचा मॉश्चराइज करण्याचे घरगुती उपाय
सूचना-जर तुमची त्वचा फार कोरडी असेल तर मॅट मॉश्चराइज वापरणे योग्य ठरेल.
फाउंडेशन वापरु नका-
जास्त फाउंडेशन लावल्यामुळे त्वचेखालील छिद्रे बंद होऊन त्वचा जाड दिसू लागते.त्याऐवजी त्वचेवर मॉश्चराइजच्या आवरणाने त्वचेला पातळ थर द्या.कारण त्वचेवर जितका कमी थर असेल तितके घाम येण्याचे प्रमाण कमी होते.तसेच यासोबतच जाणून घ्या माधुरीच्या चिरतरूण सौंदर्याची खास रहस्य
पावडर-पावसाच्या दिवसांमध्ये पावडर न लावणेच उत्तम कारण पाण्यासोबत ती ब-याचदा निघून जाऊ शकते.त्याऐवजी क्रीम अथवा जेल Bronzer,Creamy Blush अथवा Cheek Stains वापरा.त्यामुळे पिंगमेंटेश सहज झाकले जाईल.तसेच तुमचा मेक-अप बराच काळ राहील देखील.असे असले तरी तुम्ही केलेल्या या सर्व प्रयत्नांनंतर देखील थोडासा घाम हा येणारच.अशा वेळी त्याला टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न करु नका.त्यापेक्षा तो घाम कापडाने डॅब करा व पुन्ही टच-अप करा.
सूचना-जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये देखील पावडर लावण्याची इच्छा असेल तर त्यासाठी blotting powder वापरा.तसेच वाचा खोबरेल तेल- त्वचा स्वच्छ करण्याचा आणि मेकअप काढण्याचा उत्तम उपाय !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock