महिलांमध्ये सेक्स ड्रीम ही एक सामान्य गोष्ट आहे.पण तुम्हाला एखाद्या रात्री झोपेत ऑर्गेझम मिळाल्यामुळे आनंदाने जाग आली आहे का ?अनेकजणींना झोपेतून जाग येताना अशा भावना जाणवतात ज्या ऑर्गेझम सारख्या असतात.त्यामुळे सहाजिकच ही अवस्था काल्पनिक आहे की वास्तव याबाबत तुमचा गोंधळ उडू शकतो.एक महिला याबाबत सांगते की,” माझ्या स्वप्नात मला मी एके दिवशी एका देखण्या अनोळखी पुरुषासोबत सेक्स करताना दिसले व त्या क्षणी माझ्या योनीमार्गाजवळ मला सुंदर संवेदना जाणवू लागल्या.पण त्या भावनेमुळे मला जाग आली व मी क्लायमेक्स गाठू शकले नाही.तर दुस-या एका महिलेने सांगितले की,” मी माझ्या आयुष्यात असा अनुभव कधीच घेतला नाही.अगदी माझ्या ख-या जीवनात देखील.”यासाठी जाणून घ्या या ’3′ कारणांमुळे स्त्रियांंना orgasm चा आनंद मिळत नाही.
पुरुषांना ब-याचदा झोपेत अशा भावनांना आवर न घालता आल्याचा अनुभव येतो ज्याला वेट ड्रीम अथव नाईट फॉल असे म्हणतात.ज्यामध्ये शरीर गरजेपेक्षा अधिक स्पर्म निर्माण करते व त्यामुळे काही पुरुषांना झोपेत स्खलन झाल्याचा अनुभव येतो.पण महिलांना देखील रात्री झोपेत असताना ऑर्गेझम मिळत असल्याचे त्यांनी कसे समजावे.यासाठी जाणून घ्या याबाबत काही महत्वाची सत्ये.
१.हे केवळ स्वप्न नसून खरा ऑर्गेझम आहे.
हार्ट टू हार्ट कांउसलिंगचे प्रख्यात सेक्सोलॉजिस्ट डॉ.राजन भोसले यांच्या मते झोपेत तुम्ही जे अनुभवता तो खरा ऑर्गेझम असतो.तुम्ही याबाबत गोंधळता कारण तुम्हाला हा ऑर्गेझम कोणत्याही शारीरिक उत्तेजनाशिवाय मिळाला असतो.तसेच वाचा ब्लेन्डेड ऑर्गेझमचा आनंद घेण्यासाठी खास ४ सेक्स पोझिशन
२.काही महिलांनाच झोपेमध्ये या ऑर्गेझमचा आनंद मिळतो.
१९९३ मध्ये Kinsey et al सादर केलेल्या Kinsey Report मध्ये ३७ टक्के महिलांना त्यांच्या पंचेचाळिशी नंतर झोपेत या ऑर्गेझमचा आनंद मिळल्याचे आढळले आहे.उरलेल्या ६३ टक्के महिलांना हा आनंद का मिळत नाही हे पुढील मुद्यांमध्ये वाचा.
३.ही संवेदना सर्वात आनंददायी अशी संवेदना आहे.
ज्यांना झोपेमध्ये ऑर्गेझमचा क्लायमेक्स गाठता येतो त्या स्त्रीया खरंच भाग्यवान असतात.डॉ.भोसले यांच्या मते अनेक महिला सांगतात की झोपेमधला ऑर्गेझमचा आनंद हा वास्तवातील ऑर्गेझम पेक्षा अधिक आनंददायी व समाधानकारक असतो.तसेच वाचा एकदा सेक्स दरम्यान ऑर्गेझम मिळवल्यानंतर तुम्ही पुन्हा किती वेळाने सेक्स करु शकता?
४.हा ऑर्गेझम गाढ झोपेत अनुभवता येतो.
झोपेत येणा-या स्वप्नांचा अभ्यास करण्यासाठी घेण्यात आलेल्या REM (Rapid Eye Movement) नूसार या क्षणी तुमच्या योनीमार्गाला होणारा रक्तपुरवठा वाढतो,शरीर शिथिल होते व श्वास जलदगतीने सुरु होतो.डॉ.भोसले यांच्यामते या टप्पामध्ये तुमचे शरीर कोणताही प्रतिकार करत नसल्यामुळे तुम्हाला तुमचे विचार व भावना चांगल्या रितीने अनुभवता येतात.जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा गाढ झोपेमध्ये तुम्हाला ऑर्गेझमचा आनंद अनुभवता येतो.
५.तुम्ही असा ऑर्गेझम मिळावा यासाठी फक्त आशा ठेऊ शकता.
आंतरिक संवेदनेतून आपल्याला नेहमी कोणतीही गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक हवी असते.पण रात्री झोपेतील ऑर्गेझम असा हट्ट करुन मिळू शकत नाही तुम्ही फक्त त्यासाठी आशा करु शकता.तसेच तुम्ही हा अनुभव सतत घेऊ शकत नाही.अंदाजे तुम्हाला दोन महिन्यातून एकदा असा अनुभव येऊ शकतो.
६.जर तुम्ही सेक्सबाबत मोकळ्या मताच्या असाल तर तुम्हाला हा ऑर्गेझम मिळणे शक्य आहे.
तुमच्या सेक्सच्या मतांवर हा ऑर्गेझम अवलंबून असू शकतो.(सेक्सबाबत संकुचित व्यक्तींनी वाचणे थांबवावे )संशोधनानूसार ज्या महिला सेक्सबाबत मोकळ्या अथवा खुल्या मताच्या असतात त्यांना रात्री झोपेत ऑर्गेझम मिळण्याची शक्यता वाढते. जाणून घ्या स्त्रीयांमध्ये हस्तमैथुनाचा परिणाम मासिकपाळीवर होतो का ?
७.रात्री झोपेत सेक्सच्या भावना जागृत झाल्यामुळे ऑर्गेझम मिळण्याची शक्यता वाढते.
एका अभ्यासानूसार ज्या महिलांना झोपेत सेक्सच्या भावना जागृत होतात त्यांना झोपेत ऑर्गेझमचा आनंद अनुभवता येतो.जाणून घ्या फोरप्ले मुळे स्त्रिया सेक्ससाठी प्रवृत्त होतात का?
८.चिंता व रात्री झोपेत मिळणा-या ऑर्गेझमचा आनंद यांचा जवळचा संबध असू शकतो.
जर तुम्ही चिंताग्रस्त महिला असाल तर तुम्हाला जीवनात काहीतरी उत्साह निर्माण करणारे हवे असते.१९७६ साली Genetic Psychology या जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानूसार चिंता व रात्री झोपेतील ऑर्गेझम यांच्यामध्ये सकारात्मक संबध दिसून आला आहे.जाणून घ्या कामक्रिडा वाढवा या ‘5’ विचित्र मात्र रोचक पर्यायांनी !
संदर्भ-
[1] Kinsey, A. C., Pomeroy, W. B., & Martin, C. E. (81). „& Gebhard, PH (1953). Sexual behavior in the human female.
[2] Abel, G. G., Murphy, W. D., Becker, J. V., & Bitar, A. (1979). Women’s vaginal responses during REM sleep. Journal of sex & marital therapy, 5(1), 5-14.
[3] Wells, B. L. (1986). Predictors of female nocturnal orgasms: A multivariate analysis. Journal of Sex Research, 22(4), 421-437.
[4] Henton, C. L. (1976). Nocturnal orgasm in college women: its relation to dreams and anxiety associated with sexual factors. The Journal of genetic psychology, 129(2), 245-251.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock