Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्लीप अॅप्नीयावर उपचार न केल्यास आरोग्याला काय धोका निर्माण होतो?

$
0
0

एका २७ वर्षीय पी.एच.डी स्टुडंट रितूला झोपताना घरघर होणे,घोरणे अशा समस्या झोपेतील सामान्य समस्या आहेत असे वाटत होते.हे साधे घोरणे नसून ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे हे तिच्या लक्षात येईपर्यंत तिला यामध्ये काळजी करण्याचे काहीच कारण वाटले नाही.एकदा तिच्या बहिणीकडे ती गेली असताना तिच्या बहिणीच्या असे लक्षात आले की रितू केवळ घोरत नसून झोपेत मध्येच तिचा श्वास घेण्यास तिला त्रास होत असल्यामुळे अधूनमधून ती झोपेतून जागी देखील होत आहे.रितू Obstructive Sleep Apnea (OSA) या झोपेच्या विकाराने ग्रस्त असून या विकारावर तातडीने उपचार केले गेले नाहीत तर हा विकार प्राणघातक ठरु शकतो.यासाठी जाणून घ्या जाणून घ्या झोप कमी येण्याची ही काही कारणे.

Obstructive Sleep Apnea (OSA) या विकारामध्ये झोपेत श्वसनमार्गामध्ये अडथळा आल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.ही समस्या सातत्याने होत रहाते व दीर्घकाळाने या समस्येमुळे उच्च रक्तदाब,हार्ट अटॅक,स्ट्रोक लठ्ठपणा अशा आरोग्य समस्या निर्माण होतात.

न्यू दिल्लीच्या सांस फांऊडेशनचे फाऊंडर व Pulmonologist डॉ.पी.पी.बोस यांच्याकडून जाणून घेऊयात स्लीप अॅप्नीयामुळे आरोग्याला होणारे धोके-

स्लीप अॅप्नीया ही एक दुर्लक्षित आरोग्य समस्यांपैकी एक समस्या आहे.अनेकांना या आरोग्य समस्येबाबत काहीच माहिती नसते पण ज्यांना या झोपेच्या विकाराबाबत थोडीफार माहिती असते त्यांना या विकारामुळे होणा-या गंभीर परिणामांची जाणिव नसते.२००९ मध्ये AIIMS द्वारे घेण्यात आलेल्या एका अभ्यासानूसार भारतीय लोकसंख्येतील १३ टक्के लोकांना OSA ही समस्या असल्याचे आढळून आले आहे.त्यापैकी ४ टक्के लोकांनी डॉक्टरकडे जाऊन याची तपासणी केलेली आहे.तसेच या विकाराचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये तीनपट अधिक असल्याचे देखील आढळले आहे.तसेच वाचा लहान मुलांमधील घोरण्याच्या समस्येमागे दडलीत ही ’8′ कारणं.

स्लीप अॅप्नीया मुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य समस्येवर होणा-या परिणामांचे पुरावे दिवसेंदिवस वाढतच आहेत.OSA मुळे ह्रदयाचे ठोके वाढतात व रक्तदाब देखील वाढतो त्यामुळे सहाजिकच ह्रदयावरचा दाब वाढू लागतो.याचे आणखी एक कारण असे की यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते ज्यामुळे ह्रदयाची कार्यक्षमता वाढविणा-या मज्जासंस्थेच्या विशिष्ट भागावर प्रभाव पडतो.शिवाय OSA मुळे हायपरटेंशन,मधूमेह होण्याची शक्यता असते.तसेच त्यामुळे फुफ्फुसे,ह्रदय व मेंदूच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होतो.यासाठी वाचा घोरणे ही समस्यादेखील देते या ’6′ आजारांचे संकेत !

National Commission on Sleep Disorders Research नूसार स्लीप अॅप्नीया मुळे  कार्डिओ व्हॅस्युलर डिसिज होऊन त्यामुळे वर्षभरात सुमारे ३०,००० मृत्यू होतात.

त्यामुळे घोरण्यासोबत श्वसनाची समस्या असल्यास ती Obstructive Sleep Apnea (OSA) ही गंभीर आरोग्य समस्या असू शकते.तसेच या स्लीप अॅप्नीया समस्येवर वेळीच उपचार न केल्यास गंभीर आरोग्य समस्या होऊन मृत्यू देखील होऊ शकतो.जे लोक स्लीप अॅप्नीयावर वेळीच उपचार करीत नाहीत त्यांना स्ट्रोक येण्याचा चारपट अधिक व ह्रदयविकारांचा तीनपट अधिक धोका असतो.या झोपेच्या विकाराचा मधूमेह,मेटाबॉलिक विकार,वजन वाढणे,हार्ट अटॅक,ह्रदय बंद पडणे,स्मरणशक्ती कमजोर होणे,लवकर वृद्धत्व येणे व अकाली मृत्यू यांच्याशी सबंध असू शकतो.

रस्त्यावरील सुरक्षेसाठी देखील स्लीप अॅप्नीयावर उपचार करणे फार गरजेचे आहे. National Highway Traffic Safety Administration च्या मते स्लीप अॅप्नीयामुळे अपुरी झोप व एकाग्रता कमी झाल्यामुळे दरवर्षी १ लाख कार अॅक्सिडंट,चाळीस हजार जखमी व १५५० लोक मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले आहे.याच्या परिणामांमुळे कामाच्या ठिकाणी होणा-या दुखापती वाढणे,कामाची गुणवत्ता घसरणे,जगण्यातील मौज कमी होणे व आरोग्य सेवांमुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार अशा गोष्टी वाढत आहेत.यासाठी घोरण्याच्या समस्येतून मिळवा ‘विनाशस्त्रक्रिया’ सुटका !

जर वेळीच स्लीप अॅप्नीयावर योग्य व वेळीच उपचार केले तर पुढे होणारा वैद्यकीय खर्च कमी केला जाऊ शकतो.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>