पिकनिकच्या वेळेस किंवा अनेक ऑफिसमध्ये चहा, कॉफी किंवा अगदी पाणी पिण्यासाठीदेखील Styrofoam च्या कप्सचा वापर केला जातो. फोमचे कप वापरणं सोयीचे असले तरीही त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. हे अनेकांना ठाऊक नसते. म्हणूनच जाणून घ्या फोमच्या ग्लासचा वापर करणं आरोग्यासाठी कसे त्रासदायक ठरते.
- Styrofoam cups म्हनजे काय ?
Styrofoam हे ब्रॅन्ड नेम आहे. हे कप्स polystyrene या मटेरियलपासून बनवलेले असतात. polystyrene foam फूड पॅकेजिंगसाठी वापरण्यापूर्वी त्यामध्ये Polystyrene इंजेक्ट केले जाते. त्या अशाप्रकारच्या कपातून चहा, कॉफी पिणं आरोग्याला त्रासदायक ठरते.
- Styrofoam cups वापरण्यासाठी सुरक्षित आहेत का ?
Styrofoam कपामधील Polystyrene घटक सहज आहारात किंवा पेयांमध्ये उतरू शकतात. Styrene घटक कॅन्सरला कारणीभूत ठरतात. यामुळे नाकातील, डोळ्यातील मस्कस / घाण यांचे प्रमाण वाढणे, खाज येणे याचे प्रमाण वाढते. सोबतच थकवा वाढतो, एकाग्रता कमी होते, हार्मोन्समध्ये चढ-उतार होतो परिणामी थायरॉईड निगडीत अनेक समस्या वाढू शकतात.
- Styrofoam कप्स पर्यावरणपूरक आहेत का ?
Styrene घटक नष्ट होण्यासाठी सुमारे 500 वर्ष लागतात. त्यामुळे केकळ सोयीस्कर आहेत म्हणून फोमचे ग्लास, प्लेट्स वापरण्यापूर्वी विचार नक्की करा. कारण फोमचे ग्लास,प्लेट्स नष्ट करायला खूप वर्षांचा कालावधी लागतो.
Polystyrene नष्ट करण्यासाठी ज्या प्रक्रियेचा वापर केला जातो त्यामधूनही हवेत प्रदुषण निर्माण होण्याचे प्रमाण अधिक असते.
- Styrofoam cups ऐवजी कशाचा वापर करावा ?
Styrofoam cups ऐवजी पर्यावरणाला पुरक असलेल्या पर्यायांचा वापर करा.
बायोडिग्रेडेबल कप्स – :
इतर कपांप्रमाणे यामध्ये कागदाचं आवरण नसते. प्रामुख्याने कार्डबोर्डचा वापर करून आतील आवरण बनवलेले असते. यामुळे चहा, कॉफी गरम राहते. यामधील टॉक्झिसिटी म्हणजेच यामुळे शरीराला त्रास होण्याची शक्यता कमी होते.
पुन्हा वापरू शकाल असे कप्स -:
प्लॅस्टिक किंवा फोमच्या कपांऐवजी तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकाल अशा म्हनजेच काचेचे, स्टिलचे किंवा अॅल्युमिनियम चे कप वापरा. हे स्वच्छ करायलादेखील सहज सोपे असतात. सोबतच पर्यावरणपूरक असल्याने तुम्ही त्याचा वापर करणे अधिक फायदेशीर आहे.
References:
[1] Tawfik MS, Huyghebaert A. Polystyrene cups and containers: styrene migration.
Food Addit Contam. 1998 Jul;15(5):592-9. PubMed PMID: 9829045.
[2] North, E. J., & Halden, R. U. (2013). Plastics and Environmental Health: The Road Ahead. Reviews on Environmental Health, 28(1), 1–8. http://doi.org/10.1515/reveh-2012-0030.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock