काही लोकांना राईचा पर्वत करायची सवयच असते. लहान सहान गोष्टींचा, समस्यांचा इतका विचार करत बसतात की त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गापेक्षा त्या समस्येतून गुंता अधिक वाढवून ठेवतात. स्वतःच्या मनाने, अति विचार करण्याच्या सवयीमुळे सारेच बिघडते. तुम्हीही अशांपैकीच एक असाल तर या ’5′ गोष्टींशी तुम्ही सहाजिकच लगेच कनेक्ट करू शकाल .
- तुम्हांला काही गोष्टींबाबत सार्याच गोष्टी माहिती असतात -
तुम्हांला एखाद्या गोष्टींबाबत अगदी इत्यंभूत सारी माहीती आठवत असते. काही वर्षापूर्वीही एखाद्या दुपारी, तुमचा राग करणारा शेजारी काय म्हणाला होता.. असे सारे तुम्हांला आठवत असेल तर याचा अर्थ तुम्ही या विषयी खूप वेळ विचार केला आहे.मग तो असं का म्हणाला असेल याबाबत तर्कवितर्क बांधले असतील.
- साध्या सरळ गोष्टीदेखील गुंतागुंतीच्या करता -
एखाद्या वेळेस तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन केला आणि त्याने / तिने ” मी बिझी आहे नंतर बोलू ” असा मेसेज दिल्यास तुम्ही यावरही विचार करत बसता. नेमके काय झाले असेल ? तो / ती खरंच बिझी असेल की तीला / त्याला माझ्याशी बोलायचेच नाही. असा विचार करत बसता. त्यावरून मग तुमची चिडचिड होत राहते. अनेकदा तुमच्या साथीदारला कळतही नाही नेमके काय झाले ? तुमचे काय बिनसले आहे.
- आपल्या आनंदावर आपणच विरजण घालतो -
आपणच आपल्या आयुष्यातील गुंता वाढवून ठेवतो. त्यामुळे अनेकदा लहान सहान गोष्टींमधला आनंद, चांगुलपणा पहायचा आपणच विसरून जातो. कोणी सहज सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोवर, कोट्सवर तुम्ही अनेक दिवस विचार करत बसता.
- विचित्र निष्कर्ष काढण्याची सवय -
अल्पावधीमध्येच आपण स्वतःच्या मनाने काही विचित्र निष्कर्ष काढतो. जर तुमच्या साथीदाराने तुमच्या मित्र/ मैत्रिणीला स्मार्ट/ हुशार म्हटले की लगेच तुम्हांला असे वाटते की तुम्ही साथीदाराला योग्य नाही. तुम्हांला तो मंद समजतो. अतिविचार करण्याच्या सवयीमधून तुम्ही त्या दोघांबद्दल अगदी पुढचे विचारही करू लागता.
- तुम्ही बोलण्याआधी रिहर्सल करता -
तुमच्या आयुष्यात ‘क्रश’ असणार्या व्यक्तीशी किंवा अगदी साथीदारासोबतही काही गोष्टींचं स्पष्टीकरण देताना त्याची रिहर्सल करतात. आयुष्यातल्या लहान सहान परिस्थितीमध्येही आपण स्वतःच प्रश्न विचारतो आणि त्याला उत्तरं देतो. त्यातून काही शक्यतांचा विचार करत बसतो. मग अति विचार करण्याची सवय वाढत जाते.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock