गरोदरपणी तुम्ही जे खाता अथवा पिता त्याचा तुमच्या बाळाच्या विकासावर परिणाम होत असतो. गरोदरपणी आहारात काही प्रकारचे खाद्यपदार्थ अथवा मद्यपान जाणिवपूर्वक वगळावे लागते तर काही फळे व खाद्यपदार्थ जाणिवपूर्वक खावे लागतात.यासाठी जाणून घ्या गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स
तसेच जाणून घेऊयात डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट प्रिया काथपाल यांच्याकडून गरोदरपणी सुशी खाणे का टाळावे.
सुशीतील कच्च्या माशांमध्ये मर्क्युरी असते-
अनेक सीफूड मध्ये पा-याचे घटक असतात व सुशीमध्ये कच्चे मासे वापरले जातात.पाण्यामध्ये असताना मानवनिर्मित कोळसा-निर्मिती प्रकल्प अथवा इतर नैसर्गिक स्त्रोतातून माशांमध्ये पारा जातो.त्यामुळे गरोदरपणी असे मासे मोठ्या प्रमाणावर सेवन केले तर त्या माश्यांमधील पारा तुमच्या शरीरातून रक्तात जातो व त्यामुळे बाळाच्या मज्जातंतू व मेंदूच्या विकासावर विपरित परिणाम होऊ शकतो.यासाठी जाणून घ्या गरोदरपणाच्या काळात हे ’10′ पदार्थ खाणं टाळाच !
सुशीमधील कच्च्या माशांमध्ये बॅक्टेरिया व सुक्ष्मजीव असतात-
सुशी मधील माश्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया व जीवजंतू तुम्हाला गरोदरपणी आजारी पाडू शकतात.सुशीमधील कच्च्या माशांमधील Listeria या सुक्ष्मुजीवामुळे गरोदर माता आजारी पडू शकते व तिच्या गर्भाचे आरोग्य देखील बिघडू शकते.रेस्टॉरंटमधील सुशी शेफ जीवजंतू मुक्त मासे सुशीमध्ये वापरण्यासाठी प्रशिक्षित केले गेलेले असले तरी गरोदरमातेने असे कच्चे मासे खाणे तिच्या व बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.मात्र आपण जेव्हा मासे शिजवून खातो तेव्हा मात्र माश्यांमधील सुक्ष्मजीव उष्णतेमुळे नष्ट होतात.यासाठी मांसाहार हेल्दी करण्यासाठी या ’6′ चूका टाळा हे जरुर वाचा.तसेच उत्तम आरोग्यासाठी आपण सर्व प्रकारचे सीफूड १४५ डिग्रीवर शिजवणे अपेक्षित असते.मात्र सुशीमध्ये तसे करता येत नाही.तसेच वाचा गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?
असे असले तरी देखील जर तुम्हाला गरोदरपणी सुशी खाण्याची तीव्र इच्छा झाली असेल तर त्यासाठी तुम्ही कच्चे मासे नसलेला सुशीचा प्रकार निवडू शकता.अनेक रेस्टॉरंट मध्ये आजकाल कच्च्या माशांमुळे होणारा धोका टाळण्यासाठी व्हेज सुशीचा पर्याय देखील उपलब्ध असतो.पण अशा प्रकारची सुशी ऑर्डर करताना देखील ती बनविण्यासाठी लागणारे घटक तुम्हाला गरोदरपणी आरोग्यदायी ठरतील का हे जरुर तपासा.उदा.धान्य व पालेभाज्यांमध्ये रोल केलेल्या सुशी मध्ये फोलेट असल्यामुळे ते तुमच्यासाठी गरोदरपणी हेल्दी असू शकते.मटार व ब्रोक्रोली घातलेल्या सुशीतून तुम्हाला लोह मिळू शकते.यासाठी जाणून घ्या गर्भारपणात काय खाणे टाळाल ?
सूचना-गरोदरपणी सुशी तुम्ही तुमच्या स्वत:च्या जोखमीवर खाऊ शकता.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock