Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या एक्स्पर्ट डाएट टिप्सने गरोदरपणातील अॅनेमियावर करा मात !

$
0
0

गरोदरपणात शरीराला आयर्नची अधिक गरज असते. त्यामुळे गरोदरपणात होणारा अॅनेमिया अगदी सामान्य आहे. गरोदरपणात शरीराची गरज भागवण्यासाठी आणि गर्भाच्या वाढीसाठी अधिक प्रमाणात आयर्न घेणे गरजेचे असते. थकवा, धाप लागणे, डोकेदुखी, हात-पाय थंड पडणे ही गरोदरपणात शरीरात आयर्नची कमतरता असण्याची लक्षणे आहेत. अॅनेमियाचा धोका नेमका कोणाला असतो ?

काही वेळा आयर्नचे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे मळमळ आणि छातीत धडधडू लागते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतील. त्याचबरोबर आई अॅनेमिक असल्यास बाळ देखील अॅनेमिक होते. तुम्ही जर गरोदर असाल आणि अॅनेमिक पण तर Bon Happetee च्या Nutrition Spokesperson आणि Strategist, Akansha Jhalani यांनी दिलेल्या या डाएट टिप्स पाळा. गरोदरपणात होणा-या अॅनिमियाची कारणं,लक्षणं,उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय !

  • आहारात आयर्नचा समावेश करा:

गरोदर स्त्रीने दिवसाला ३८ mg आयर्न घेणे गरजेचे असते. आयर्न दोन प्रकारचे असतात- haem आणि non-haem. आणि हा तुमच्या आहारातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. चवळीची पालेभाजी, राजमा, खोबरं, भोपळ्याच्या बिया, तीळ हे आयर्नचे काही शाकाहारी स्त्रोत आहेत. तर मांसाहारामध्ये चिकन, मटण आणि कोलंबी यात आयर्न असते. आहारात टाळू नका हे ’7′ आयर्नयुक्त पदार्थ !

  • पुरेशा प्रमाणात फॉलेट घ्या:

हेल्दी रेड ब्लड सेल्स आणि नवीन सेल्सच्या निर्मितीसाठी शरीराला फॉलेटची आवश्यकता असते. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, सोयाबीन हे फॉलेटचे उत्तम नैसर्गिक स्त्रोत आहेत. आहारातील या ‘१०’अन्नघटकांनी वाढवा तुमचे हिमोग्लोबिन

  • व्हिटॅमिन बी १२ घेणे विसरू नका:

हेल्दी रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीस व्हिटॅमिन बी १२ ची मदत होते. दुधाचे पदार्थ, चिकन, मटण न खाणाऱ्या महिलांमध्ये व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दिसून येते. त्याचबरोबर अंड्यामध्ये देखील पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी १२  असते. चणे-गूळ खा, अ‍ॅनिमिया हटवा !

  • व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खा:

संत्र, आवळा, मोसंबी यांसारखी व्हिटॅमिन सी युक्त फळे खा. कारण व्हिटॅमिन सी मुळे शरीरात आयर्नचे शोषण होण्यास मदत होते.

टीप: तुम्हाला आयर्न सप्लिमेंट्स घेण्याची गरज आहे का ? हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने गोळ्या घेऊ नका. गर्भारपणात रक्तदान करणे योग्य आहे का ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>