स्वाईन फ्लू ने अनेक बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याबद्दल लोकांच्या मनात भीती आहे. परंतु, त्यावर वेळीच उपचार केल्यास आजार बरा होण्याची दाट शक्यता असते. १-३ दिवसात स्वाईन फ्लूची लक्षणे शरीरात वाढू लागतात. Metropolis Healthcare चे Scientific Services आणि Operations चे Group President डॉ. निलेश शहा यांनी सांगितले की स्वाईन फ्लू ९-१० दिवसांपेक्षा अधिक काळ राहिल्यास ते गंभीर लक्षण आहे. याचा धोका नेमका कोणाला आहे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. स्वाईन फ्लू बरा होऊ शकतो का ?
- लहान मुले: ५ वर्षांपेक्षा लहान मुले विशेषतः २ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्वाईन फ्लू होण्याची शक्यता अधिक असते.
- जेष्ठ नागरिक: ६५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांना स्वाईन फ्लू होण्याचा धोका असतो.
- गरोदर स्त्रिया: प्रसूतीपूर्वी २ आठवडे या काळात गरोदर स्त्रियांना स्वाईन फ्लू होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर गर्भपात झालेल्या स्त्रियांनी देखील सावध राहणे गरजेचे आहे.
- काही आजार असल्यास: अस्थमा, हृदयविकार, मधुमेह, किडनीचे आजार, यकृत किंवा रक्ताचे आजार आणि emphysema असलेल्या पेशंटना स्वाईन फ्लू होण्याचा धोका अधिक असतो. म्हणून हे त्रास असल्यास सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे. व्हिडियो- ‘स्वाईन फ्लू’ व आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक उपचार – डॉ. बालाजी तांबे
- Immunocompromised patients: ज्या लोकांना काही ठराविक औषधांमुळे immunosuppressed होतो त्यांना स्वाईन फ्लू चा धोका असतो. Immunocompromised म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे. रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास आजार बळावण्याची शक्यता वाढते. आणि त्यात स्वाईन फ्लू मध्ये पेशंटची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. एचआयव्ही असल्यास किंवा इम्म्युनिटी कमी असल्यास आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. स्वाइन फ्लू बळावतोय ! घाबरू नका , काळजी घ्या.
म्हणून जर तुम्हाला असा काही त्रास असेल अथवा तुम्ही यापैकी कोणत्या गटात तुम्ही मोडत असाल किंवा तुम्हाला स्वाईन फ्लूची काही लक्षणे आढळली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होईल आणि त्यावर उपचार करणे कठीण होईल. लसीकरण करणे हा स्वाईन फ्लू रोखण्याचा उत्तम उपाय आहे. जर तुम्हाला आजराचा धोका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वाइन फ्लूच्या नेमक्या लक्षणांची तुम्हाला माहिती आहे का ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock