Pore strips हे सध्या विशेषत: इंटरनेटवर लोकप्रिय असलेले एक स्कीन केअर प्रॉडक्ट आहे.आपण ब-याचदा ब्लॅकहेड्स व स्कीन पोअर दूर करण्यासाठी इंस्टाग्राम अथवा युट्यूबवर शेअर केलेले Pore strips चे व्हिडीओ पहातो.या स्ट्रीप्सचा वापर करुन ब्लॅकहेड काढल्यावर चकचकीत झालेले अनेकांचे चेहरे देखील त्यासोबत दाखवण्यात येतात.मात्र याबाबत Dermatologists चे काय मत आहे हे जाणून घेणे फार गरजेचे आहे.यासाठी जाणून घेऊयात Pore strips बाबत Dermatologists डॉ.शेजल शाह यांचे काय मत आहे.
जाणून घेऊयात काय आहेत या Pore strips ?
सामान्यत: Adhesive व Polymer चा वापर करुन विणलेल्या साहित्यापासून या Pore strips तयार करण्यात येतात.त्यामुळे जेव्हा तुम्ही ही पट्टी ओली करता ती तुमच्या त्वचेवर चिकटली जाते.त्यानंतर ही पट्टी तुम्हाला ५ ते १० मिनीटे तशीच ठेवावी लागते.आणि जेव्हा तुम्ही या स्ट्रीप्स ओढून काढता त्यावर तुम्हाला Stalagmite, Stalactite या गोष्टी दिसू लागतात.तुम्ही पाहू शकता की त्वचेवरुन काढल्यावर त्या स्ट्रीपवर तुमच्या त्वचेतील तेल,डेड स्कीन,बॅक्टेरिया,केस व घाण चिकटल्यामुळे ती पट्टी ऑक्सिडाईड होऊन काळपट रंगाची दिसू लागते.थोडक्यात Pore strips त्वचेच्या पृष्टभागावरील सर्व गोष्टी काढून टाकते.जाणून घ्या घरगुती उपायांनी हटवा ‘व्हाईटहेड्स’ची समस्या !
Pore strips चा उपयोग होतो का?
या पट्टीमुळे त्वचा खोलवर स्वच्छ केली जात नाही.जरी या पट्टीचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा मऊ व स्वच्छ दिसत असली तरी त्यामुळे ब्लॅकहेड निर्माण होणे टाळता येत नाही.थोडक्यात जरी Pore strips वापरल्यामुळे तुम्हाला बरे वाटत असले तरी ते तितकेसे पुरेसे नाही.
Pore strips मुळे त्वचेची छिद्रे मोकळी होतात का?
त्वचेची छिद्रे मोकळी करण्यासाठी Pore strips या सोबत तुम्ही Retinol सारखे इतर त्वचा उपचार करायला हवेत. Retinoids व केमिकल पील यामुळे चांगला फायदा होऊ शकतो.जाणून घ्या फेशियल करणे त्वचेसाठी ठरू शकते त्रासदायक !
Pore strips चा वापर करणे सुरक्षित आहे का?
काही लोकांना या स्ट्रीपच्या वापरामुळे Capillaries ची समस्या होईल अशी शंका वाटते पण खरंतर Pore strips च्या वापरामुळे त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही.मात्र या स्ट्रीपचा सातत्याने वापर केल्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.यासाठी या स्ट्रीप्सचा वापर आठवड्यातून एकापेक्षा अधिकवेळा करु नये.जर तुम्हाला सौदर्यप्रसाधनांची अॅलर्जी असेल तर चेह-यावर या स्ट्रीप्सचा वापर करण्यापूर्वी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे.अवश्य वाचा सौंदर्य खुलवण्यासाठी डर्मा रोलर घरी वापरणं कितपत सुरक्षित ?
Pore strips वापरण्याचे काही नियम आहेत का?
Pore strips काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे.या स्ट्रीप्स वापरण्यापूर्वी त्वचा स्वच्छ केलेली असावी.त्वचेवर या स्ट्रीप बराच वेळ लावून ठेऊ नका.त्वचेवर पट्टी लावल्यावर त्रास होत असल्यास त्वरीत ती काढून टाका व या पट्टीचा वापर केल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.पहिल्यांदा वापर करताना त्याचा हातावर प्रयोग करा व तुमच्या त्वचेवर त्याचा काय परिणाम होतो ते पहा.त्वचेला या स्ट्रीप्सचा त्रास होणार नाही याची खात्री पटल्यावरच Pore strips चेह-यावर वापरा.जाणून घ्या अॅक्ने, ब्लॅकहेडचा त्रास दूर करण्यासाठी कसा कराल मुलतानी मातीचा वापर
तात्पर्य- जरी तुम्हाला Pore strips वापरण्याची गरज वाटत नसली तरी केवळ मौज म्हणून तुम्ही ती विकत घेऊ शकता.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock