Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हिपॅटायटीसग्रस्त रुग्णांनो पाळा ही आहाराची पथ्यपाणी !

$
0
0

हिपॅटायटीस हे एक यकृताचे इनफेक्शन आहे.सामान्यत: हे इनफेक्शन व्हायरसमुळे होते.यावर अॅन्टी-व्हायरल औषधांचे उपचार केले जातात.हिपॅटायटीस इनफेक्शन होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.लवकर बरे होण्यासाठी औषधोपचारांसोबत पौष्टिक आहार घेणे देखील गरजेचे असते.हिपॅटायटीस आजारपणात घेण्यात येणा-या आहाराबाबत अनेक समज-गैरसमज आहेत.यासाठी जाणून घ्या हिपॅटायटिस – कारणे, लक्षणं आणि निदान !

अपोलो हॉस्पिटलच्या Medical Gastroenterology विभागाचे Senior Consultant डॉ.मनिष जांबवलीकर यांच्यामते पोषक व संतुलित आहार घेतल्यास हिपॅटायटीस इनफेक्शनपासून लवकर बरे होता येते. या इनफेक्शन मुळे शरीराचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शरीराला भरपूर उर्जेची गरज असल्याने अशा रुग्णांचा आहार हा भरपूर प्रोटीन्स व कॅलरीज युक्त असावा.तसेच हिपॅटायटीस सी पासून तुमच्या यकृताचा बचाव करण्यासाठी या खास टीप्स !जरुर करा.

जाणून घ्या हिपॅटायटीस इनफेक्शन झाल्यास काय आहार घ्याल व काय खाणे टाळाल-

कोणते पदार्थ खाल-

तृणधान्ये-डॉ.जांबवलीकर यांच्यामते हिपॅटायटीस बरा होण्यासाठी फायबरयुक्त व पौष्टिक तृणधान्यांचा आहार फार महत्वाचा आहे.असे पदार्थ पचनासाठी खूप चांगले असतात.

फळे व भाज्या-यकृताच्या कोणत्याही आजारापासून बरे होण्यासाठी आहारामध्ये फळे व भाज्या असणे फार महत्वाचे आहे.कारण फळे व भाज्यांमध्ये भरपूर पोषणमुल्ये असतात व त्या पचनासाठी हलक्या असतात.तसेच त्यामध्ये भरपूर अॅन्टी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे यकृताच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.

तेल-लक्षात ठेवा आहारामध्ये हेल्दी तेलांचा वापर करा.यीसाठी हिपॅटायटीस ग्रस्त रुग्णांना ऑलिव्ह तेल,तिळाचे तेलअळशीचे तेल वापरण्याचा सल्ला देण्यात येतो.

प्रथिने-निरोगी यकृतासाठी लो-फॅट मिल्क,डेअरी प्रॉडक्टस,मांस,बीन्स,सोयाबीन,अंडी खाणे आवश्यक आहे.यासाठी वाचा दररोज एक अंड खा आणि आरोग्याच्या समस्या दूर ठेवा !

कोणते पदार्थ खाणे टाळाल-

सॅच्युरेटेड व ट्रांन्स फॅट-रेडमीट,बेकरी प्रॉडक्ट्स,होल मिल्क व चीज,बटर,क्रीम,तळलेले पदार्थ,जंकफूड असे सॅच्युरेटेड व ट्रांन्स फॅट असलेले पदार्थ हिपॅटायटीस रुग्णांनी मुळीच खाऊ नयेत.तसेच जाणून घ्या घातक ‘जंकफ़ूड’ला आत्ताच दूर करण्याची ’10′ कारणे

अल्कोहोल-अल्कोहोलमुळे यकृताचे कार्य बिघडते व त्यावर दाब येतो.

ओटीसी औषधे-डॉ.जांबवलीकर यांच्यामते हिपॅटायटीस रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ला शिवाय कोणतेही ओव्हर-दी-काउंटर औषध घेऊ नये.तसेच अशा रुग्णांनी व्हिटॅमिन सप्लीमेंट घेणे देखील टाळावे.तसेच जाणून घ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वेदनाशामक औषधे खरेदी करणे सुरक्षित आहे का ?

प्रक्रिया केलेल पदार्थ-प्रक्रिया केलेले पदार्थ हिपॅटायटीय रुग्णांनी मुळीच खाऊ नयेत.कारण असे प्रक्रिया केलेले पदार्थ यकृतासाठी त्रासदायक असून त्यामध्ये कोणतेही पोषणमुल्ये नसतात.यासाठी हिपॅटायटीस रुग्णांनी प्रक्रिया केलेला ब्रेड,चीज व सर्व प्रकारचे फास्ट फूड खाणे टाळावे.जर अशा रुग्णांनीहे पदार्थ खाल्ले तर त्यांना हिपॅटायटीस इनफेक्शनपासून बरे होण्यास वेळ लागू शकतो.यासाठी जाणून घ्या यकृत व फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी आहारात हवीत ही 10 सुपरफूड्स !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles