दिवसभर थकल्यानंतर बिछान्यावर पडल्या पडल्या झोपावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते. लवकर झोपणे आणि लवकर उठणे आरोग्यासाठी जसे फायदेशीर असते. तसंच झोपल्यानंतर उठताना योग्य पद्धतीत उठल्यास फायदा होतो. या ‘५’ फायद्यांसाठी लवकर झोपणे योग्य !
नीट, शांत झोप मिळाल्यास तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते. पण यासाठी झोपेतून उठण्याची पद्धत योग्य असणे गरजेचे आहे. कारण सकाळच्या घाईत उशीर होईल या काळजीने आपण झटपट उठतो. खरंतर असे घाईघाईत न उठता उठल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी थोडा वेळ घ्या.
आयुर्वेदानुसार काही सहज सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे शरीर व मन स्वच्छ करू शकता, तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता. न्यू एज आयुर्वेदाचे आयुर्वेदीक एक्सपर्ट डॉ. आर. भगवती यांनी झोपेतून उठण्याची योग्य पद्धत सांगितली. सकाळी लवकर उठण्यासाठी महत्वाच्या टीप्स
आयुर्वेदानुसार सूर्य उगवण्यापूर्वी उठावे. कारण त्या वेळेस वातावरण अत्यंत शुद्ध, शांत आणि प्रसन्न असते. त्यामुळे झोपेतून उठल्यावर शरीर व मन देखील ताजेतवाने होते. तसंच सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची सुरुवात फ्रेश होते व संपूर्ण दिवस चांगला जातो. उत्तर दिशेला डोकं करून झोपण्याची सवय आरोग्यावर करते हा गंभीर परिणाम !
१. जाग आल्यानंतर उजव्या कुशीवर वळा. त्यानंतर उठून बसा. जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीराला आराम मिळतो आणि त्यामुळे मेटाबॉलिक अॅक्टिव्हिटी कमी होते. आणि जर तुम्ही पटकन डाव्या बाजूला वळून उठून बसलात तर त्याने तुमच्या cardiac system खूप प्रेशर येतं.
२. उठल्यानंतर बेडवर शांतपणे बसा. त्यानंतर हातांचे तळवे एकमेकांवर चोळा आणि डोळ्यांवर ठेवा.
हात एकमेकांवर चोळल्याने नर्व्हज अॅक्टिव्हेट होतात आणि तुम्हाला पूर्णपणे जाग येते. त्यांनतर हात संपूर्ण चेहरा आणि खांद्यांवरून फिरवा.
३. त्यांनतर हात नाकाजवळ नेऊन कोणत्या नाकपुडीतून श्वासाचा प्रवाह अधिक आहे, ते पहा. श्वासाचे प्रमाण ज्या नाकपुडीतून अधिक असेल त्या (म्हणजे उजव्या नाकपुडीतून अधिक श्वासच प्रवाह असल्यास उजव्या) तळहातावर किस करा. त्यानंतर दुसऱ्या तळहातावर किस करा.
४. त्यानंतर बेडवरून खाली उतरून ज्या नाकपुडीतून श्वासाचा प्रवाह अधिक असेल त्या बाजूचा पायाचा स्पर्श जमिनीला आधी करा आणि त्यानंतर दुसरा पाय खाली ठेवा.
डाव्या कुशीवर झोपणे का ठरते फायद्याचे ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock