गरोदरपणात इतर सगळी काळजी घेतली जाते. पण ब्रेस्टची योग्य काळजी घेण्याकडे अनेक महिलांचे दुर्लक्ष होते. गरोदरपणात ब्रेस्टमध्ये अनेक बदल होतात. दूध तयार करणे, हार्मोनल चेंजेसला प्रतिसाद देणे अशा अनेक गोष्टी बदलत असतात. ब्रेस्टमध्ये दुखणे, त्यातून स्त्राव बाहेर येणे अशा काही समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते. परंतु, ब्रेस्ट मसाज केल्याने ही सगळी त्रासदायक लक्षणे सुसह्य होण्यास मदत होते. जाणून घ्या स्त्रीयांच्या स्तनाबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी
गरोदरपणात ब्रेस्ट मसाज करण्याचा सल्ला कुटुंबातील मोठी माणसे देतात. त्यामुळे दूधनिर्मिती अधिक चांगल्या प्रकारे होते आणि ब्रेस्टचा आकार योग्य राखला जातो, असे त्यांचे मत असते. मसाज करताना त्रास न होता बरं वाटत असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञ देखील ब्रेस्ट मसाज करणे फायदेशीर असल्याचा सल्ला देतात. स्त्री शरीरात या ’6′ टप्प्यांवर होतात Breast च्या आकारात बदल !
परंतु, मसाज केल्याने प्रसूतीवेदना लवकर चालू होतात, अशी देखील माहिती उपलब्ध आहे. ब्रेस्ट मसाज आणि ब्रेस्ट स्टिम्युलेशन यामध्ये फरक आहे. मसाज हा हलका आणि रिलॅक्स करणारा असतो तर स्टिम्युलेशनची क्रिया ही काहीशी हार्श असते. ब्रेस्टचे आरोग्य जपण्यासाठी काही ’7′ खास टिप्स
ब्रेस्ट मसाज घेणे योग्य आहे का ?
गरोदरपणात ब्रेस्टमध्ये होणारे बदल प्रत्येक माता अनुभवते. ब्रेस्टमध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्यांची विशेष काळजी घेणे देखील गरजेचे असते. काही वेळा ब्रेस्टच्या खालच्या बाजूला रॅश येतात, त्वचा कोरडी पडते. त्यावर मॉइश्चराईझर लावण्याची गरज असते. तर काहींना ब्रेस्टमध्ये दुखणे, त्यातून स्त्राव बाहेर पडणे अशा समस्या असतात. अशावेळी ब्रेस्टला स्पर्श केल्याने देखील त्रास होतो. या फायद्यांसाठी प्रसूतीनंतर नवमातांनी अवश्य मसाज घ्यावा !
गरोदरपणात ब्रेस्ट मसाज केल्याने हानी होते, हे सिद्ध करणारा कोणत्याही प्रकारचा अहवाल उपलब्ध नाही. म्हणून, जर गरोदरपणात तुम्हाला त्रास कमी करून रिलॅक्स राहण्यासाठी ब्रेस्ट मसाज घ्यायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.
- ब्रेस्टवर अधिक दाब देऊ नका.
- मसाज करण्यासाठी फक्त हातांच्या बोटांचा वापर करा.
- मसाज करताना काही त्रास जाणवत असेल तर लगेचच मसाज करणे बंद करा.
- निप्पल्सवर कोणत्याही प्रकारचा दाब देणे टाळा. कारण त्यामुळे निप्पल्स स्टिम्युलेशन होईल आणि प्रसूतीवेदना लवकर सुरु होतील.
- गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यात किंवा प्रसूती होण्याच्या काही दिवस आधी तुम्ही मसाज घेणार असाल तर काळजीपूर्वक घ्या.
मसाज केल्याने फायदा होतो का?
गरोदरपणात ब्रेस्टचे होणारे त्रास कमी करण्यास मसाज फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर नैसर्गिक प्रसूतीस चालना मिळण्यास मदत होते. गरोदरपणात ब्रेस्ट मसाज केल्याने दूध निर्मिती वाढण्यास आणि ब्रेस्टचा आकार योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते, असे लॅक्टेशन एक्स्पर्टचे मत आहे. त्याचबरोबर प्रसूतीनंतर ब्रेस्ट मसाज करणे देखील फायदेशीर ठरते. त्यामुळे स्तनपान करताना होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. बाळाला दूध पाजताना ब्रेस्टमध्ये कोणते बदल होतात ?
Reference:
Singh, N., Tripathi, R., Mala, Y. M., & Yedla, N. (2014). Breast stimulation in low-risk primigravidas at term: does it aid in the spontaneous onset of labour and vaginal delivery? A pilot study. BioMed research international, 2014.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock