गरोदरपणाच्या काळात दुसर्या तिमाहीत किंवा 24 ते 28 व्या आठवड्यात ग्लुकोज चॅलेन्ज टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. या टेस्ट द्वारा गरोदरपणाच्या काळात स्त्रीला मधूमेहाचा त्रास जडलाय का ? याची तपासणी केली जाते. गरोदरपणाच्या काळात स्त्री दोन जीवांची आहे म्हणून खूप खायला दिले जाते. चटकदार डोहाळ्यांवर मात करा या ’10′ हेल्दी पदार्थांनी ! खूप कॅलरीयुक्त पदार्थ, जंक फूड खाल्ल्याने गरोदरपणात मधूमेह जडण्याचा (gestational diabetes) धोका बळावतो. गरोदर स्त्रीने दोन जीवांंसाठी म्हणजे नेमके किती खावे ?
ग्लुकोज चॅलेन्ज टेस्ट कशी केली जाते ?
गरोदरपणाच्या काळात 24 ते 28 व्या आठवड्यात स्त्रीला 75 ग्रॅम ओरल ग्लुकोज दिली जाते. रक्ताची चाचणी करण्यापूर्वी 2 तासांपूर्वी 75 ग्रॅम ग्लुकोज पावडर पाण्यात मिसळून प्यावी. यानंतर केलेल्या रक्त तपासणीमध्ये ग्लुकोजची पातळी तपासली जाते. जर सामान्य प्रमाणापेक्षा हे अधिक असेल तर gestational diabetes चे निदान केले जाते. गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत
ग्लुकोज चॅलेन्ज टेस्ट ची गरज कोणाला असते ?
सार्याच गरोदर स्त्रियांना ग्लुकोज चॅलेन्ज टेस्ट करावी लागते. यामुळे gestational diabetes चा धोका ओळखता येतो. पण यासोबतच प्रामुख्याने
- वयाची पस्तीशी पार केलेल्या स्त्रिया
- लठ्ठ स्त्रिया
- घरात मधूमेहाचा त्रास असल्यास
कोणत्या गोष्टीची काळजी घ्याल ?
रक्ताच्या रिपोर्टवरून शरीरात वाढलेल्या ग्लुकोजच्या पातळीचे निदान लगेजच केले जाते. ब्लड रिपोर्टनुसार जर ग्लुकोजची पातळी 40 mg/dl पेक्षा जास्त असेल तर gestational diabetes.चा धोका असतो.
गरोदरपणात तुम्हांला gestational diabetes.चे निदान झाल्यास त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. बाळ मोठे होते, प्रसुतीमध्ये काही दोष निर्माण होऊ शकतात. असा सल्ला consultant gynaecologist Paras Hospital, Gurgaon च्या डॉ. पूजा मेहता देतात. बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी डॉक्टर gestational diabetes चे निदान झाल्यानंतर त्यानुसार पुढील उपचार ठरवतात. नक्की वाचा गर्भवती स्त्रीच्या आहारात आवश्यक असलेली दहा सुपरफूड्स
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock