आपल्याला हवी असलेली वस्तू मिळवण्यासाठी चारचौघात हंगामा करणे हे अनेक लहान मुलांचे शस्त्रच असते. मॉल, रेस्ट्रॉरेंट किंवा पाहुण्यांसमोर मुलं हट्ट करत असल्यास तुमचा राग अनावर होऊ देऊ नका किंवा हतबल होऊ नका. लहान मुलांचे असे वागणे स्वाभाविक आहे. पण या वागणूकीला सकारात्मक वळण देण्यासाठी पालकांनी थोडा संयम पाळणे गरजेचे आहे. मग मुलांचा हट्टीस्वभाव सुधारण्यासाठी रिद्धीविनायक हॉस्पिटल्सचे मानसोपचारतज्ञ आणि काऊन्सलर डॉ. पवन सोनार यांनी पालकांना दिलेल्या या काही टीप्स
1. तोडगा काढा –
अनेकदा लहान मुलं पब्लिक प्लेस म्हणजेच हॉटेल, सुपरमार्केट किंवा पाहूण्यांच्या घरी हट्टीपणा करून हंगामा करतात. अशावेळी मुलांना ती गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करा. सुरवातीला मुलं नाकारण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यामागील कारण योग्यपणे पटवून दिल्यास त्यांचा हट्ट हळूहळू कमी होण्यास मदत होईल.
मुलांशी बोलणे असफल ठरत असेल तर तेथून मुलाला घेऊन बाहेर पडा आणि एखाद्या शांत ठिकाणी जा. यामुळे तुम्हांला त्या पार्टीतून बाहेर पडावे लागेल किंवा दूर रहावे लागेल. पण यामुळेच त्यांचा हट्ट कमी होईल. मुलांच्या अवाजवी मागण्या पूर्ण करणे हे चूकीचे आहे.
2. विचार करून प्रतिसाद द्या –
मुलांच्या हट्टी स्वभावाला संभाळताना पालकांकडे संयम असणे आवश्यक आहे. मुलांना मारणे, ओरडणे हा त्यावर कधीच उपाय असू शकत नाही. अधिकाधिक शांत राहण्याचा प्रयत्न करा. मुलांना शांत होऊ द्या मग त्यांच्याशी बोला. मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा
3. धीर सोडू नका –
मुलं पालकांना ‘मॅनिप्युलेट’ करण्यात हुशार असतात. खूपच हुशारीने मुलं त्यांना हवी असलेली वस्तू मिळवू शकतात. त्यामुळे चारचौघात आपला हट्ट पुरवण्यासाठी मुलं काही ट्रिक्स खेळून पालकांना इमोशनली कमकुवत करतात. त्यामुळे त्यांच्या समोर न झुकता ठामपणे ‘नाही’ म्हणा. चारचौघात तमाशा नको म्हणून वेळोवेळी त्यांचे हट्ट पुरवू नका.
4. शांतपणे बोला –
मुलांचा आरडा ओरडा सुरू असताना त्यांच्याशी बोलणे कठीण आहे. परंतू परिस्थिती शांत झाल्यानंतर त्यांना समजावून सांगा. नियमित 10-15 मिनिटे मुलांशी अशा वागणूकीबाबत बोला. त्यांचे वागणे कसे चुकीचे आहे. हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. पण बोलताना डोळ्यांमध्ये किंवा तुमच्या स्वरामध्ये राग नसेल याची काळजी घ्या.
5. लक्ष दुसरीकडे वळवा –
मुलांचा हट्ट किंवा हंगामा सुरू झाल्यास त्यांचे लक्ष एखाद्या दुसर्या गोष्टीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. मग त्यांच्या आवडत्या खेळण्याकडे, पुस्तकाकडे लक्ष वळवा. त्यांना एखादी गोष्ट सांगा. यामुळे त्यांना हट्टाचा विसर पडेल. या ’10′ मार्गांनी कमी करा मुलांचा ‘द्वाड’पणा !
6. मुलांच्या वागणूकीमागील परिस्थितीचा विचार करा –
‘प्रत्येक अॅक्शन ही कशाची तरी रिअॅक्शन असते’. त्यामुळे मुलांच्या बाबतीतही या गोष्टीचा विचार करा. भूक, अपुरी झोप, खूप खेळणे, गर्दी, अति आवाज काही विशिष्ट वास यामुळेदेखील मुलं हंगामा करतात. त्यामुळे पालकांनी अशा गोष्टींकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.
7. मुलांना त्यांची ‘स्पेस’ द्या -
मुलांचा शारिरीक आणि सोबतीने मानसिक विकासही होत असतो. अशावेळी त्यांना स्वतःची ओळख करून घ्यायला थोडा वेळ आणि स्पेस द्या. त्यांच्या अनुभवातून त्यांना शिकायला वेळ द्या.
संबंधित दुवे -
व्हिडियो: लहान मुलांच्या मनात नेमकं दडलयं काय ?
कशी ओळखाल मुलांच्या मनातील आत्महत्येची लक्षणं ?
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - 7 ways to handle your child’s temper tantrum
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.