Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

उटण्याने मिळवा चेहर्‍याच्या या ’4′समस्यांपासून सुटका !

$
0
0

पूर्वीच्या काळी बोचर्‍या थंडीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्यातली मजाच काही और असते. आधी तेलाचा मसाज नंतर उटण्याची  आंघोळ आणि मग फराळावर ताव अशी दिवाळीची सुरवात होत असे. पण फक्त दिवाळीपुरता उटणं मर्यादीत न ठेवता त्याचा वापर वर्षभर करणे आरोग्यासाठी हितकारी आहे. उटणं हे एक उत्तमप्रकारचे स्क्रबर आहे. त्यामुळे बाजारातून विकतची स्क्रबर्स आणण्यापेक्षा तुम्ही वर्षभर घरच्या घरीदेखील उटणं बनवू शकता. मग त्याची कृती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

उटण्याचे आरोग्यदायी फायदे – :  

# 1 त्वचा स्वच्छ करते 

उटण्यामधील आयुर्वेदीक घटकांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी अ‍ॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स कमी होण्यास मदत होते. यामुळे सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेंब  मिसळणे फायदेशीर ठरते. आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते. मात्र त्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणे टाळा. जायचे झाल्यास सनस्क्रीनचा वापर आवर्जून करावा. पायावरील टॅन काढण्याचे घरगुती उपाय !

# 2 चेहर्‍याला नैसर्गिकरित्या चमक देते 

उटण हे एका स्क्रबरप्रमाणे काम करत असल्याने टॅनमुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत करते. तर बेसन त्वचेवर साचलेला डेड स्किनचा स्तर कमी करण्यास मदत करते. परिणामी त्वचेचा पोत सुधारतो. चंदनामुळे त्वचेत थंडावा राहण्यास मदत होते. तर यामध्ये दूध मिसळल्यास त्वचेला कांती मिळते. ( नक्की वाचा – कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी महत्त्व ! )

# 3 चेहर्‍यावरील केसांची वाढ रोखते 

चेहर्‍यावरील केसांची वाढ कमी करण्यासाठी अनेक भारतीय स्त्रिया उटण्याची निवड करतात. उटण्याची पेस्ट चेहर्‍यावर गोलाकार दिशेने फिरवल्यास मुळापासून त्याची वाढ रोखण्यास मदत होते. महिनाभर हा प्रयोग केल्यास त्याचे निकाल अधिक स्पष्टपणे दिसून येतात. पण उटण्याने मसाज करताना त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. त्वचेचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी भिजवलेली मसूर डाळ, सुकवलेल्या संत्र्याच्या सालीची पेस्ट व उटणं याचे एकत्र मिश्रण बनवून त्याचा हलका मसाज चेहर्‍यावर करावा. या घरगुती उपचारांनी मिळवा, चेहर्‍यावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती!

#4 त्वचेचे एजिंग कमी होते 

त्वचेवर सुरकुत्या पाहणे कोणाला आवडते ? पण वयानुसार त्यांचे येणे सहाजिकच आहे. उटणं लावल्याने ही समस्या कमी करण्यास मदत होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग, अ‍ॅन्टी ऑक्सिडेटीव्ह आनि दाहशामक क्षमता असते. यामुळे सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. यामध्ये मध मिसळल्यास त्वचा मुलायम  होण्यास मदत होते.  यामुळे त्वचेचे नुकसान भरून निघण्यासोबतच ते टाळणेदेखील शक्य होते. नितळ त्वचा हवीय ? मग या ’10′ भाज्या व फळं अवश्य खा!


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Ubtan recipe for glowing, clear skin

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>