स्क्रिन पिगमेंटेशन तुमच्या सौंदर्यामध्ये अडथळा निर्माण करतायत का ? कोपरे आणि गुडघ्याची त्वचा इतर त्वचेपेक्षा अधिक जाडसर असल्याने काळपट दिसतात. त्यात नेहमीच्या काही अॅक्टीव्हिटीज याभागाचे अधिक नुकसान करण्यास कारणीभूत ठरतात. कालांतराने त्वचेवर डेड स्क्रिनचा थर साचल्याने पिगमेंटेशन अधिक वाढते. मग अशावेळी या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी दूध, मध आणि हळद अधिक फायदेशीर ठरते.
हळद, मध आणि दूधाचा पॅक स्किन पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. दूधात लॅक्टीक अॅसिड असल्याने त्यात नॅचरल ब्लिचिंग गुणधर्म आहेत. तर हळद ही अॅन्टीसेप्टिक, अॅन्टी बॅक्टेरियल आणि दाहशामक असल्याने तेथील त्वचा सुधारण्यास मदत होते. मध हे त्वचा मॉईशचराईज करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेमधील जाडसरपणा कमी होतो व ती अधिक हायड्रेटेड होते.
कसा बनवाल हा पॅक -
- कच्च दूध, मध आणि हळद एकत्र करून त्याची पातळ पेस्ट बनवा.
- कोपरे, गुडघा यावर ही पेस्ट वर्तुळाकार दिशेत फिरवत लावा. 20-25 मिनिटे हा पॅक त्वचेवर सुकू द्यावा.
- त्यानंतर पॅक पाण्याने स्वच्छ धुवा. ‘
- महिनाभर हा प्रयोग केल्यास तुम्हांला अपेक्षित निकाल मिळण्यास मदत होईल.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - Quick home remedy for dark elbows
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.