आजकाल प्रत्येकजण घराची निवड करताना वास्तूशास्त्र पाहतो. वास्तूशास्त्रानुसार घराचा दरवाजा कुठे आहे ? स्वयंपाकघर कुठे आहे ? जेवायची जागा कशी आहे ? हे तपासून पाहतो. पण तुमची झोपण्याची स्थिती काय आहे? डोके कुठल्या दिशेला हवे ? यावरही तुमचे आरोग्य अवलंबून असते हे तुम्हांला ठाऊक आहे का ? घरात सार्या सुखवस्तू आहेत पण आरोग्य पुरेशी साथ देत नाही असा प्रत्यय अनेक घरात येतो. यावेळेस तुम्ही किती महागड्या बेडवर झोपता यावर केवळ तुमचे आरोग्य अवलंबून नसते तर तुमची स्थितीदेखील एक महत्त्वाची भूमिका बजावते.
मानवी शरीराचे स्वतःचे मॅग्नेटिक फिल्ड असते. जेव्हा तुम्ही उत्तरेला डोके करून झोपता तेव्हा शरीर मॅग्नेटीक फिल्डशी समांतर नसते. याचा परिणाम रक्तदाबावर होतो.आणि तो पुन्हा सुरळीत ठेवण्यासाठी हृद्यावर अधिक ताण येतो. डोके, मान, पोट दुखत असताना नेमके कसे झोपावे ? याबाबतचा एक्सपर्ट सल्ला नक्की जाणून घ्या
तुम्ही उतार वयात असाल आणि तसेच तुमच्या रक्तवाहिन्या कमजोर असतील तर अशा चूकीच्या स्थितीत झोपण्याच्या सवयीमुळे पॅरॅलिसिस ( पक्षघात) किंवा हॅमरेज होण्याचा धोका अधिक बळावतो. जेव्हा तुम्ही आडवे झोपता तेव्हा आपोआपच हृद्याचे ठोके कमी होतात. उत्तरेला डोके करून झोपल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया बिघडते. त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. ताण वाढतो. म्हणूनच तुम्हांला रात्री 8 तासाची झोप घेऊनही सकाळी फ्रेश वाटत नसेल तर तुमच्या झोपण्याची दिशाही तपासून पहा. या ’6′ कारणांमुळे तुमच्या दिवसाची सुरवात डोकेदुखीने होते !
- झोपताना नेमके डोके कोणत्या दिशेले असणं फायदेशीर ठरते ?
झोपताना डोके दक्षिणेला किंवा पूर्वेला ठेवून झोपा. पश्चिमेला डोके करून झोपणेदेखील तितकेसे त्रासदायक ठरत नाही. Pain management specialist, डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या सल्ल्यानुसार, झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या कुशीवर झोपल्याने छातीत जळजळणे( हार्टबर्न) चा त्रास कमी करतो. यासोबतच डाव्या कुशीवर झोपण्याचे इतर कोणते फायदे आहेत हे देखील नक्की जाणून घ्या.
इंटरेस्टिंग फॅक्ट्स -
तुम्हांला ठाऊक आहे का ? तुमच्या साथीदारासोबतचे बॉन्डींग वाढवण्यासाठी दक्षिणेकडे डोके करून झोपण्याची सवय फायदेशीर ठरते. लव्ह लाईफबद्दल संकेत देतात या ’6′ झोपण्याच्या स्थिती !
Reference:
Dr. Bhojraj Dwivedi, Vaastu inquisitiveness and Solutions, 2003, Page-129-130.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock