Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सायकलिंग केल्याने मांड्या बल्की होतात का ?

$
0
0

वजन कमी करण्यासाठी सायकलिंग करणे फायदेशीर ठरते. परंतु, सायकलिंगमुळे मांड्या बल्की म्हणजे फुगीर दिसतात, असे अनेकांना वाटते. हे खरे आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही V’s फिटनेस स्टुडिओच्या फिटनेस एक्स्पर्ट रोशनी शहा यांच्याशी संवाद साधला. सायकल चालवून कसे घटवाल परिणामकारक वजन !

सायकल चालवल्याने कमी वेळात अधिक कॅलरीज बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी अनेकदा सायकलिंगाचा पर्याय निवडला जातो. परंतु, त्यामुळे मांड्या फुगीर होतात, त्याचा आकार वाढतो. मांड्यांचा आकार वाढणे किंवा त्या बल्की होणे याचा अर्थ असा नाही की मांड्यांजवळील चरबी वाढते. मसल टोन सुधारल्यामुळे मांड्यांचा आकार वाढतो. पायाचे स्नायू जेव्हा बळकट होतात तेव्हा त्यांचा आकार, साईज वाढते. सायकलिंग केल्यानंतर शिश्नाला सुन्नता का येते ?

सामान्यपणे स्त्रियांमध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यायामप्रकारामुळे अगदी स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे देखील बल्कीनेस दिसून येत नाही. स्त्रियांमध्ये testosterone च्या कमी प्रमाणामुळे स्नायू बल्की होण्यास, फुगीर होण्यास अडथळा येतो.

सायकलिंग करण्यापूर्वी मांड्यांचा आकार योग्य राखण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा:

  • स्ट्रेच: Iliotibial band हा मांड्यांच्या बाजूला असलेला स्नायू आहे. जर तुम्ही वॉर्मअप न करता सायकलिंगला सुरुवात केली तर या स्नायूवर अधिक ताण येतो. त्रास होतो. म्हणून, सायकलिंगला सुरुवात करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करणे महत्त्वाचे आहे. सायकलिंग करताना पायात  foam rollers घाला.
  • स्ट्रेंथ ट्रेन: बाईकवर खूप वेळ बसल्याने पाठीच्या खालच्या भागावर ताण येतो. तसंच खडबडीत, खड्डे असलेल्या रस्त्यावर गाडी चालवल्यास पाठीच्या खालच्या भागाला हिसके बसतात. योग्य प्रमाणात मसल ट्रेनिन्ग एक्सरसाईज न केल्यास पाठीच्या खालच्या भागाला त्रास होऊ शकतो. तसंच सायकलिंगबरोबरच स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास पायांना सुरेख आकार येईल.
  • वॉर्मअप नियमित करा: जर तुम्ही पुरेसा व्यायाम केला नाही विशेषतः पायांना पुरेसा व्यायाम न मिळण्यास पायाच्या नसा आकुंचन पावतात. त्यामुळे पाय दुखू लागतात, त्रास होतो. म्हणून, सायकलिंग करण्यापूर्वी नियमित वॉर्मअप करा. त्यामुळे अधिक वेळ सायकल चालवण्यास मदत होईल.

थोडक्यात: सायकल चालवणे तुम्हाला आवडत असेल तर जरूर सायकल चालवा. मांड्या बल्की होतील या भीतीने सायकल चालवणे सोडू नका. फक्त सायकलिंगला सुरुवात करण्यापूर्वी नियमित वॉर्मअप करा. त्यामुळे स्ट्रेंथ, कार्डिओवस्क्युलर फिटनेस आणि मेटॅबॉलिझम सुरळीत राखले जाईल. गर्भारपणात वजन नियंत्रित ठेवण्यासाठी करा घरच्या घरी सायकलिंग !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>