Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

रडताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा का येतात?

$
0
0

एलिझाबेथ गिल्बर्टने तिच्या ‘इट,प्रे,लव’ या पुस्तकामध्ये लिहीले आहे की,”रडल्याबद्दल माफी मागू नका कारण या भावनेशिवाय माणूस केवळ रोबट आहे.”

डोळ्यातून अश्रू येणे ही मनातील भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे.रडण्याबाबत स्त्रीया पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील असतात.आकडेवारीनूसार स्त्री महिन्यातून सरासरी ५.३ वेळा रडते तर पुरुष महिन्यातून सरासरी १.३ वेळा रडतो.जैविकदृष्ट्या पुरुषांमध्ये अधिक प्रमाणामध्ये Testosterone हे हॉर्मोन असते जे पुरुषांना रडण्यापासून रोखते.त्या उलट स्त्रीयांमध्ये Prolactin हे हॉर्मोन अधिक असते ज्यामुळे अश्रू उत्तेजित होतात.मात्र डोळ्यांमध्ये अश्रू येण्यासाठी केवळ ही दोन हॉर्मोन्स कारणीभूत ठरत नाहीत.एकूण तीन प्रकारचे रडणे असून त्यामध्ये विविध यंत्रणा व केमिकल्सचा समावेश असतो.जाणून घ्या डोळ्यांमधील शुष्कता कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय !

रडण्याचे प्रकार-

बुब्बुळाच्या बाह्य आवरणामधील lacrimal ग्रंथीद्वारे Protein-Rich Antibacterial द्राव सतत पाझरत असतो.जेव्हा आपण डोळ्यांची उघडझाप करतो तेव्हा डोळ्याच्या संपूर्ण पृष्टभागाला चिकटलेला हा द्राव पाझरतो.यांना Basal tears म्हटले जाते व या अश्रूंमुळे डोळयांना वंगण मिळते व डोळ्यांचे सतत संरक्षण होते.तसेच वाचा पापणी फडफडण्यामागील ’8′ कारणं !!

तुम्ही कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते याचे निरिक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की हे Reflex tears असतात.हे अश्रू वारा,धूर व केमिकल्स पासून डोळ्यांचे संरक्षण करतात.हे अश्रू डोळ्यांत गेलेला कचरा अथवा घाण बाहेर टाकण्यासाठी मदत करते.

रडण्याचा आणखी एक प्रकार हा भावनिक अश्रू हा अाहे.या प्रकारामध्ये नाकपुड्या लाल होतात व मोठ्या प्रमाणावर डोळ्यांमधून गालांवर अश्रूंच्या धारा वाहतात.या प्रकारचे अश्रू ताण,निराशा,दु:ख व आनंदाच्या प्रतिसादामुळे निर्माण होतात.जाणून घ्या कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?

रडताना हॉर्मोन्स व न्युरोट्रान्समिटरची असलेली भुमिका-

प्रोलॅक्टीन व टेस्टोस्टेरॉन या दोन हॉर्मोन्सशिवाय इतर काही हॉर्मोन्स व न्युरोट्रान्समिटर देखील रडण्यामध्ये महत्वाची भुमिका बजावतात.

प्रेमातून अश्रू येणे-

Serotonin या हॉर्मोनमुळे विविध शारीरिक व मानसिक कार्ये प्रभावित होतात.मूडचे संतुलन, भूक मंदावणे,जखम झालेल्या ठिकाणी रक्त गोठणे,लिबीडो कमी होणे,हाडांची घनता कमी होणे अशा कार्यामध्ये या हॉर्मोनची भुमिका महत्वाची ठरते.सतत Serotonin या हॉर्मोनच्या उच्च पातळीमुळे Osteoporosis होण्याची शक्यता असते.

याचा रडण्याशी नेमका कसा सबंध येतो? एका अभ्यासानूसार बाळंतपणानंतर स्त्रीयांमधील Tryptophan कमी होते जे Serotonin (5-HT) चे Precursor असते.यामुळे या काळात त्यांच्यामध्ये भावनिक अस्थिरता व रडण्याचे प्रमाण वाढते.प्रेमाचा संबध देखील (5-HT) शी येतो त्यामुळे प्रेमामुळे आपल्याला अधिक रडू येते.संशोधकांच्यामते (5-HT) च्या पातळीमुळे रडण्याचे प्रमाण वाढते.

ताणाचा निचरा करणे-

पिट्युटरी ग्रंथीमधून ACTH (Adrenocorticotropic Hormone) निर्माण होते ज्यामुळे Adrenal ग्रंथीला कोर्टीसोल निर्माण करण्याचा संदेश मिळतो.कोर्टीसोल मुळे ब्लड प्रेशरब्लड शूगर वाढते.त्यामुळे तुम्ही Hyperventilate होता व तुमच्यामध्ये शारीरिक बदल होतात.ताण कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे रडणे.रडल्यानंतर बरे वाटल्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल.कारण रडल्यामुळे ACTH (Adrenocorticotropic Hormone) चा निचरा होतो व कोर्टीसोल हे ताण हॉर्मोन्स कमी होते.

शरीरातील ताण कमी करणारे Enkephalin हे आणखी एक केमिकल आहे.यामुळे वेदना कमी होतात व मूड सुधारतो.हे एखाद्या वेदनाशामकासारखे असते.यामुळे स्पाइनल कॉर्डमधील वेदनांचे संदेश रोखले जातात.जाणून घ्या आजच्या जीवनशैलीत कशी ओळखाल नैराश्याची लक्षणं !

निरनिराळ्या वयातील रडणे-

नवजात बाळ Basal tears सह जन्माला येते.कारण नवजात बाळ रडताना त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत नाहीत जेव्हा ते मोठे होऊ लागते त्यांच्या डोळ्यांमधून पाणी येऊ लागते.लहान बाळ भूक लागणे,झोप येणे,चीडचीड किंवा अस्वस्थता यामुळे रडते.बाळ जरा मोठे झाल्यावर जसे की १० महिन्यांचे झाल्यावर इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खोटे खोटे रडते.ज्यांना आपण खोटे अश्रू असे म्हणतो.जाणून घ्या या ’5′ कारणांंसाठी बाळाचे रडणे फायदेशीर !

तरुणपणी प्रोलॅक्टीन व टेस्टेस्टेरॉन निर्माण होतात.ज्यामुळे तरुण मुली सतत रडतात अथवा एखादा तरुण मुलगा कधीतरी रडतो.पुरुष फक्त एखादे मोठे नुकसान झाले तरच रडतात तर महिला चीडचीड झाल्यावर देखील रडतात.महिला मोठ्यांने रडतात व त्यांच्या डोळ्यातून भरपूर अश्रू येतात.शास्त्रज्ञांच्या मते अश्रू ग्रंथींचा आकार देखील याचे कारण असू शकतो.पुरुषांच्या अश्रू ग्रंथी महिलांच्या अश्रू ग्रंथींपेक्षा लहान असतात.त्यामुळे पुरुषांच्या डोळ्यातून भरपूर अश्रू येत नाहीत.

Testosterone व Progesterone या हॉर्मोन्सच्या बदलामुळे मध्यम वयातील व्यक्तींच्या रडण्यामध्ये बदल होतात.मध्यम वयातील पुरुष रागावतात कमी व रडतात जास्त तर या वयातील महिला कमी प्रमाणात रडतात.

प्रौढांमध्ये रडणे कितपत सामान्य आहे?

बाळ दररोज एक ते तीन तास रडते.बाळाचे रडणे नैसर्गिक आहे.जर बाळ सतत तीन आठवड्यांपेक्षा दररोज तीन तासांपेक्षा अधिक काळ रडत असेल तर मात्र ते काळजी करण्याचे कारण असून त्यासाठी वैद्यकीय मदतीची गरज असते.अशा परिस्थितीमध्ये त्याला एखादी आरोग्य समस्या असू शकते.तसेच जाणून घ्या या ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड !

लहान मुलांप्रमाणे प्रौढांमध्ये रडण्याचे प्रमाण सांगता येत नाही.कारण प्रत्येकाचे रडणे हे त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते.पुरुषांवर लहानपणापासून रडू नये असे संस्कार करण्यात येतात.त्यामुळे तरुण मुले देखील रडत नाहीत.पण पाश्चात्य संस्कृतीमध्ये पुरुषांनी रडणे मान्य आहे.आशियायी देशांमध्ये मात्र पुरुष अथवा तरुण मुलांनी रडणे हे दुर्बलतेचे एक लक्षण समजण्यात येते.

रडल्यामुळे ताण कमी होत असला तरी अनेकांना रडल्यानंतर बरे वाटत नाही.संशोधकांच्या मते यामागे तुम्ही कधी व किती प्रमाणात रडता याची अनेक कारणे असू शकतात.जसे की

  • तुम्हाला रडू येण्याची परिस्थिती
  • तुम्ही रडताना तुमच्या आजूबाजूला अनेक लोक असल्यास.कारण बरेच लोक एखाद्या व्यक्तीजवळ रडू शकतात पण दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांसमोर रडताना त्यांना अवघडल्यासारखे वाटते.
  • रडताना लोकांचा असलेला प्रतिसाद.लोकांसमोर रडल्याने मन शांत होते तसेच कधीकधी लाज देखील वाटू शकते.

तुम्ही किती रडता यावर देखील तुमचे मन:स्वास्थ अवलबूंन असते.जास्त प्रमाणात रडणे हे डिप्रेशनचे एक लक्षण असू शकते.तर कधीकधी थोडेफार रडणे अथवा रडू न येणे हे देखील गंभीर डिप्रेशनचे लक्षण असू शकते.या संदर्भातील पुराव्यांबाबत अनेक मतभेद आहेत.उदा.नेदरलॅन्डमधील संशोधकांना डिप्रेशनमध्ये भरपूर रडण्याचे काही पुरावे सापडले आहेत तर गंभीर निराशेमुळे रडू गमावल्याची उदाहरणे त्यांना सापडली नाहीत.जाणून घ्या वृद्धांच्या या ‘१०’ भावनिक गरजा पूर्ण केल्यास त्यांना नैराश्य मात करण्यास मदत होईल !

रडणे काहीतरी वेगळे केव्हा दर्शविते?

रडणे हे केवळ भावनांपुरते मर्यादित नाहीत.कधीकधी शरीरामध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे देखील रडू येते.वृद्धत्व,दुखापत होणे,इनफेक्शन,दाह अथवा ट्यूमर अशा विविध कारणांमुळे डोळ्यातून पाणी येऊ शकते.हे रडणे तुम्हाला नियंत्रित करता येत नाही म्हणून या रडण्याला Pathological Crying असे म्हणतात.

स्ट्रोक,अल्झायमर, Multiple Sclerosis व Lou Gehrig’s Disease अशा काही विशिष्ट आजारांमुळे अनियंत्रित रडू येते.संशोधकांच्या मते असे अनियंक्षित रडू भावनिक उत्तेजन,आनंद,उत्साह,दु:ख,एखाद्या गोष्टीचे दर्शन,एखाद्याचे बोलणे अथवा डॉक्टरांची दृष्टी अशा कोणत्याही गोष्टीमुळे प्रेरीत होऊ शकते.यासाठी या ७ सायलेंट किलरचा धोका वेळीच ओळखा

थोडक्यात पॅथॉलॉजिकल रडण्याशिवाय इतर रडण्यावर उपचार करावे लागत नाहीत.उलट इतर बाबतीत रडणे हा एक चांगला उपचार असू शकतो.रडण्यामुळे मनातील भावना बाहेर येतात.ताणाचा निचरा करुन निरोगी रहाण्यास मदत होऊ शकते.

  1. Collier L. Why we cry. American Psychological Association. 2014. Vol 45, No. 2.
  1. van der Veen, F. M., Jorritsma, J., Krijger, C., & Vingerhoets, A. J. (2012). Paroxetine reduces crying in young women watching emotional movies.Psychopharmacology220(2), 303-308.
  1. Vingerhoets AJ, et al. (2007) Is there a relationship between depression and crying? A reviewActa Psyhiatrica Scandinavica. May;115(5):340-51.
  2. G Andersen, Drugs Aging. 1995 Feb;6(2):105-11. Review.

Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock   


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>