कच्च्या बटाट्याचा रस डार्क सर्कल्स, पिगमेंटेशनसाठी उपयुक्त असतो, हे आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. परंतु, त्याचे इतर फायदे आपल्याला माहित नाहीत. Luke Coutinho, M.D. (Alternative Medicine and Holistic Nutritionist) यांनी कच्च्या बटाट्याच्या रसाचे फायदे सांगितले. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, फायबर्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मॅग्नेशियम, आयर्न मुबलक प्रमाणात असून काही प्रमाणात प्रोटीन देखील असतात. तसंच त्यात अँटी इन्फ्लाममेटरी गुणधर्म असतात. बटाट्याचा रस हे चांगले हेल्थ ड्रिंक आहे, असे त्यांनी सांगितले.
- कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते: बटाट्यात भरपूर फायबर्स असतात. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. तसंच बटाट्यात अजिबात कोलेस्ट्रॉल नसते. बटाटा अशाप्रकारे खाल्ल्यास नाही वाढणार तुमचं वजन !!
- सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते: सांधेदुखी मध्ये सांधे आखडले जातात व त्यांची हालचाल करणे कठीण होते. हा त्रास प्रामुख्याने गुडघे, कोपरं, खांदे त्याचबरोबर मान आणि पाठीच्या भागात जाणवतो. यावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. परंतु, कच्च्या बटाट्याचा रस हा उत्तम घरगुती उपाय आहे. बटाट्यामध्ये अँटी इन्फ्लाममेटरी गुणधर्म असल्याने सांध्यातील इन्फ्लाम्मेशन कमी होते. विशेषतः थंड वातावरणात सांधे आखडण्याचा त्रास दूर होण्यास बटाट्याचा रस फायदेशीर ठरतो. सांधेदुखीचा त्रास कमी करणारे ‘हेल्दी घरगुती पेय’
- रक्ताभिसरण आणि पचन सुधारण्यास मदत होते: काही दुखणी ही रक्ताभिसरण नीट न झाल्यामुळे उद्भवतात. त्यामुळे शरीरातील सर्व सेल्सना पोषकतत्त्वांचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. परिणामी सेल्स कमजोर होतात आणि वेगवेगळे आजार पटकन जडतात. प्रत्येक सेलचे योग्य प्रमाणात पोषण होण्यासाठी अन्नपचन आणि रक्ताभिसरण व्यवस्थित होणे गरजेचे आहे. यासाठी ग्लासभर बटाट्याचा रस घेणे फायदेशीर ठरेल. त्यामुळे पचन आणि रक्ताभिसरण सुधारून शरीराच्या प्रत्येक सेलचे पोषण होईल. पचन सुधारायला मदत करतील हे ’4′ पदार्थ
- शरीरातील pH संतुलित राखण्यास मदत होते: नैसर्गिकरित्या आपल्या शरीराचा pH बॅलन्स न्यूट्रल असतो. परंतु, खाण्याची चुकीच्या सवयी, बैठी जीवनशैली, ताण, अपुरी झोप, औषधांचा अतिरेक आणि इतर अनेक घटकांमुळे हा pH बॅलन्स बिघडतो आणि शरीरात अॅसिडिक वातावरण निर्माण होतं. या वातावरणात अनेक आजार जडतात. यामुळे शरीरातीचं pH बॅलन्स राखण्यासाठी तज्ज्ञ अल्कलाईन फूड्स खाण्याचा सल्ला देतात. कच्च्या बटाट्याचा रस हा अल्कलाईन असून शरीराचं pH सुरळीत राखण्यासाठी उत्तम आहे.
- गाऊटवर उपयुक्त: शरीरातील युरिक अॅसिडच्या अधिक प्रमाणामुळे गाऊटचा त्रास होतो. यामध्ये सांधे दुखतात, आखडतात, लाल होतात. हा त्रास साधारणपणे पायाच्या बोटांच्या सांध्याला होतो. युरिक अॅसिडच्या वाढलेल्या प्रमाणामुळे किडनीचे कार्य योग्य रीतीने होत नाही आणि त्यामुळे शरीरातून युरिक अॅसिड शरीरातून बाहेर पडण्यास अडथळा येतो. परंतु, कच्च्या बटाट्याच्या रसाने ही समस्या दूर होण्यास मदत होते. कच्च्या बटाट्याच्या रसाने युरिक अॅसिडचे विघटन होऊन ते शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते. म्हणून गाऊट पेशंटला सकाळी कच्च्या बटाट्याच्या रस घेण्याचा सल्ला दिला जातो.
- gastritis ची लक्षणे कमी करण्यास मदत होते: आजकाल अॅसिडिटी, ब्लॉटिंग, अपचन त्रास सामान्यपणे दिसून येतात. परंतु, कच्च्या बटाट्याच्या रसाने या लक्षणांवर आराम मिळण्यास मदत होते. दोन आठवड्यातून एकदा चमचा-२ चमचे बटाट्याचा रस घेतल्याने हे सगळे त्रास दूर होण्यास मदत होते.
- शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते: किडनी, यकृत, पित्ताशय आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यासाठी बटाट्याचा रस हा उत्तम उपाय आहे. तसंच त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास आणि वेगवेगळे आजार, दुखणी यावर मात करण्यास मदत होते. शरीर डीटॉक्स करण्याचे ७ सहज सोपे पर्याय !
बटाट्याचा रस बनवायचा कसा?
अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा रस घरच्या घरी बनवू शकता. मोठा बटाटा धुवून त्याची साल काढा. त्यानंतर त्याचे तुकडे करा. ज्युसरमध्ये थोडे पाणी आणि बटाट्याचे तुकडे घालून त्याचा रस काढा. हा रस नुसता प्यायला आवडत नसल्यास त्यात पाव कप गाजर किंवा बीटचा रस घालून घ्या. तुम्ही त्यात चमचाभर आल्यास रस देखील घालू शकता. उत्तम परिणामांसाठी हा रस सकाळी प्या किंवा रात्री झोपण्यापूर्वी कमी प्रमाणात म्हणजे २०० ml इतका घ्या.
टीप: कोणतीही चांगली गोष्ट योग्य प्रमाणात घेणे योग्य ठरेल. बटाट्यांमध्ये पोटॅशियम अधिक प्रमाणात असते. म्हणून जर तुम्हाला लो पोटॅशियम डाएट घेण्यास सांगितले असल्यास बटाट्याचा रस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा न्यूट्रीशियनिस्टचा सल्ला अवश्य घ्या.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock