Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

काविळचा त्रास कमी करण्यासाठी ऊस कसा ठरतो फायदेशीर ?

$
0
0

पावसाळ्याच्या दिवसात दुषित अन्न आणि दुषित पाण्याचा पुरवठा होण्याची दाट शक्यता असते. यातूनच आजारपण वाढतात. दूषित पाण्याचा शरीरात प्रवेश झाल्याने कावीळ, गॅस्ट्रो यासारखे अनेक साथीचे आजार पसरतात. अनेकांना पावसाळ्यात हमखास कावीळचा त्रास होतो. मग वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचारापेक्षा इतर पर्यायी मार्गाने काविळ उतरवण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र असे उपचार तज्ञांच्या सल्ल्याने न केल्यास काविळचा त्रास अधिक बळावून गंभीर होऊ शकतो. काविळीच्या या ’8′ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

काविळीच्या त्रासामध्ये वैद्यकीय उपचारांसोबत काही पर्यायी घरगुती उपचारदेखील केले जाते. त्यापैकी एक म्हणजे उस खाणं.  डॉक्टरांच्या उपचारांसोबत ऊस खाणं कसे फायदेशीर ठरते याबबातचा खास सल्ला मुंबईतील आयुर्वेदीक वैद्य डॉ. परीक्षित शेवडे ( आयुर्वेद MD) यांनी दिला आहे.

काविळ ही विविध प्रकारची असते. मात्र ज्यावेळेस शरीरात बिलरूबिनचे प्रमाण वाढते. पित्ताची निर्मिती वाढते. डोळे, त्वचा आणि नखं अधिक पिवळसर दिसतात अशावेळेस काविळचा त्रास कमी करण्यास ऊस खाणं हा घरगुती उपचार फायदेशीर ठरतो.

  • काविळीवर ऊस कसा ठरतो फायदेशीर ?

ऊस हा नैसर्गिकरित्या रेचक असल्याने मूत्र निर्मितीचे प्रमाण वाढवण्यास मदत करतो. सोबतच यकृताला त्रासदायक ठरणारे घातक घटक  लघवीच्या वाटे शरीराबाहेर टाकण्याचे प्रमुख काम उस करते. तसेच शरीरात वाढलेली बिलरुबिनची पातळी, पित्त आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

ऊस ही नैसर्गिक रुपातील साखर आहे. काविळीमध्ये रुग्णाला येणारा थकवा, मंदावली भूक पुन्हा नियमित करून उर्जा देण्याचं काम उसाचे सेवनाने वाढते. म्हणूनच काविळीच्या त्रासामध्ये उस खाणं नक्कीच फायदेशीर ठरते. काविळीचा त्रास पुन्हा उलटू  शकतो. म्हणूनच या ’6′ गोष्टींची काळजी घ्या. 

काविळचा त्रास कमी करण्यास उस फायदेशीर ठरतो.पण हातगाड्यांवरून ऊसाचा रस विकत आणून पिण्यापेक्षा उसाचे दांडगे विकत घेऊन घरातच त्याचे लहान तुकडे करून दिवसाला 2-3 लहान तुकडे चावून चावून खावेत. बाजारातून विकत आणलेल्या रसात अशुद्ध पाण्याचा समावेश असल्यास काविळचा त्रास अधिक धोकादायक बनण्याची शक्यता असते.

काविळचा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या उपचारांपेक्षा इतर पर्यायी प्रकारांकडे जाणं ही अनेकांची पहिली निवड असते. त्यातूनच काविळच्या औषधोपचारांबाबत अनेक समज- गैरसमज आहेत. त्यापैकी एक म्हणजे पिवळे पदार्थ काविळ अधिक वाढवते. पण हा निव्वळ गैरसमज आहे. उलट काविळच्या त्रासामध्ये हे 5 पिवळे पदार्थ खाल्ल्यास त्रास कमी होण्यास मदतच होते.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>